हेरले / वार्ताहर
दि. ६ /६/१८
गेल इंडिया कंपनीस पाईप उचलण्यासाठी विरोध व ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन करून कंपनीस बेकायदेशीररित्या पाईप उचलण्याचे पत्र देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल होऊन त्यांना अपात्र ठरवावे असे लेखी निवेदन विरोधी पक्षनेते अविनाश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना दिले आहे.
लेखी निवेदनातील आशय असा की, सन २०११ साली ग्रामपंचायत मौजे वडगांवकडे गेल इंडिया लि. कंपनीने दाभोळ बेंगलोर गॅस पाईप लाईनच्या आय.पी. स्टेशन संदर्भात जागा मागणी केली होती. सदर अनुषंगाने गावकऱ्यांशी चर्चा करून मौजे वडगांव मधील गावसभा दि. १३ ऑगस्ट२०११ ठराव क्र. ४९ ( ३ ) ने गावातून आय.पी. स्टेशनकडे जाणारा पाणंद रस्ता खडीकरण / डांबरीकरण करून देणे, प्राथमिक शाळा आवारकंपौंड करून देणे, ग्रामपंचायत कार्यालयाचा दुसरा मजला बांधून देणे, या निकषाने सदर गेल इंडिया कंपनीला ६५ आर जमिन दिलेली आहे.
सदर जमिन दिले नंतर २o११पासून गेल कंपनीने पोकळ आश्वासन देऊन मागील ग्रामपंचायत कमिटीसह आज अखेर पोकळ आश्वासने दिली आहेत. कंपनीस दिले गट क्र. ५१२ क्षेत्र सोडून ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात शिल्ल्क राहिलेल्या पाईपा ठेवल्या आहेत. सदर कंपनीचे काम संपले नंतर शिल्लक राहिलेल्या गॅस पाईप कंपनीकडून बेंगलोरला नेणेसाठी कंपनीची धडपड चालू आहे.परंतू सर्व गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या बहुसंख्य सदस्यांचा सदर पाईप हालविणेस विरोथ दर्शविला असून कोणत्याही परिस्थितीत पाणंद रस्ता व इतर मागण्याची पुर्तता होत नाही किंवा त्यासंदर्भात प्रशासकिय ठोस कागद हातात येत नाही तोपर्यंत सदर पाईप न हालवू देण्याचा निर्णय करण्यात आला.
परंतू गेल इंडिया कंपनीस पाईप उचलण्यास हरकत नसल्याचे पत्र सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत मौजे वडगांव यांनी दिले आहे.दिलेले पत्र हे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी यांना विश्वासात न घेता परस्पर दिले असून सदर पत्र हे बेकायदेशीर आहे. तरी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या भावनेचा विचार करून ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पाईप उचलण्यास विरोध आहे. सदर पत्र हे ग्रामपंचायत गावसभा दि. ८ मे२o१७ रोजीच्या ग्रामसभेचे उल्लंघन करून दिले आहे. तरी त्यांच्यावर फौजदारी दाखल करून त्यांची चौकशी करून त्यांना अपात्र कराव अशी मागणी सीईओ यांच्याकडे केली आहे. या लेखी निवेदनावर विरोधी पक्षनेते अविनाश पाटील, ग्रा.पं. सदस्या सुनिता मगदूम, माधुरी सावंत, सरिता यादव, मायावती तराळ यांच्यासह ५८ शेतकरी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसिलदार हातकणंगले, सपोनि एमआयडिसी पोलीस ठाणे, ग्रामपंचायत मौजे वडगांव, व्यवस्थापक गेल इंडिया कंपनी लि.
फोटो
गेल कंपनी विरोधात मौजे वडगांव ग्रामपंचायतीचे विरोधी पक्षनेते अविनाश पाटील व ग्रा.पं. सदस्यासह शेतकरी व ग्रामस्थ लेखी निवेदन सीईओ डॉ. कुणाल खेमणार यांना देतांना.