हेरले / प्रतिनिधी दि. ११/६/१८
शासनाचा मूल्यांकन स्वेच्छाधिकार शासन निर्णय शिक्षणक्षेत्राला घातक आहे याविरुद्ध आंदोलनाचा इशारा जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांनी दिला.
श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सभेत ते बोलत होते.कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अधीक्षक वाय.व्ही.चौगुले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करणेत आला.
डी.बी.पाटील पुढे म्हणाले शाळा तुकडी ४ वर्षानंतर शासनाचे मूल्यांकन करणे,याद्या जाहीर करणे,अनुदान देणे हा हक्क आहे पण शासनाचा मूल्यांकन स्वेच्छाधिकार कायदा कर्मचाऱ्यांचा हक्क हिरावून घेणारा आहे.या शासन निर्णयाला हद्दपार करण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्र येवून लढा उभा करण्याचे आवाहन केले.
शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस.डी.लाड यांनी संघटनांनी अनेक वर्षे संघर्ष करुन मिळविलेले हक्क शासन मोडीत काढत आहे.त्याविरुद्ध उभे राहावे असे स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी राज्यातील अनेक तुकड्या मुल्यांकनास पात्र होवून अनुदान मिळणे गरजेचे असतानाही अद्यापि मूल्यांकन केले नाही यासाठी शासनावर दबाव आणून कृतीकार्यक्रम निश्चित करण्यात आला.महाराष्ट्र राज्य विनअनुदान संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी अनुदानाचा पुढील टप्पा शासनाने देणे बंधनकारक असतानाही शासनाने जाहीर केले नाही यासाठी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर केला.एस.के.पाटील(तुरंबे) यांनी जिल्ह्यातील वेतनेत्तर अनुदानाची माहिती सांगितली.
मुख्याध्यापक संघाचे अधीक्षक वाय.व्ही.चौगुले यांनी ३४ वर्षे उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल डी.बी.पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणेत आला.स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा विभागाचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.वाय.पाटील यांनी केले.यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ए.आर.पाटील यांनी आभार मानले.
फोटो
सेवानिवृत्त वाय. व्ही. चौगुले यांचा सत्कार करतांना जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील व अन्य मान्यवर