हेरले / प्रतिनिधी दि. ११/६/१८
ग्रामपंचायत कामगार संघ कोल्हापूर शाखा हातकणंगले तालूका कर्मचारी यांच्या वतीने प्रलंबीत मागण्या बाबत गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर व पंचायत समिती हातकणंगले यांना विविध मागण्यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले.
लेखी निवेदनातील आशय असा की, सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, सुधारीत राहणिमान भत्ता रुपये २८०० प्रमाणे लागू करावा, ग्रा.पं.कर्मचाऱ्यांना दि ०७ तारखेपर्यंत पगार मिळावा,प्रा.फंड व सेवा पुस्तके अघ्यावत करणे कामी कॅम्प लावावा, ग्रा.पं.कर्मचाऱ्यांना जनरल विमा ग्रा. पं. मार्फत उतरवणेत यावा,३५ टक्के रक्कम पगारपोटी ग्रा. पं.खातेवर शिल्लक ठेवावी, ग्रा. पं. कर्मचारी यांना जि. पं. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा व सुटया मिळाव्या,गटविकास अधिकारि यांचे सहिने ग्रा. पं.कर्मचारी यांना ओळखपत्र देणेत यावे,सर्व कर्मचारी यांची ऑनलाईन पेमेंट माहिती भरणे व त्यामधील तृटी दूर करणे,१० टक्के प्रस्ताव देणे, ग्रा. पं.कर्मचारी यांना दोन जोड़ी कपड़े व स्वच्छ्ता कामगार यांना हॅण्ड क्लोज व बूट देणे, जे कोणी ग्रा.पं. कर्मचारी सेवा निवृत्व झाले असतील त्यांना प्रा. फंड देणे, ग्रॅज्युवेटी देणे, व सन २००७ पासून विशेष महगाई भत्ता लागू केला नसेल तर तो फरकासहित देणे .
वरील सर्व मागण्याची पुर्तता तात्काळ करनेत यावी अन्यथा तीव्र आंदोलन करनेत येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे हातकणंगले तालूका ग्रामपंचायत संघ यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा सचिव कॉ बबन पाटील ,केरबा डोबांळे,कृष्णा कुंभार, रणजीत खाबडे, संजय खाबडे, मारुती कोळी, तानाजी कांबळे, प्रदीप हिरवे आदी पदाधिकारीसह तालूक्यातील कर्मचारी मोठया संख्येंनी उपस्थित होते.
फोटो
हातकणंगले गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना लेखी निवेदन देतांना हातकणंगले ग्रामपंचायत संघ पदाधिकारी.