कोल्हापूरचा मोर्चा अभूतपूर्व होणार
मी येणार... तुम्हीही या...
कोल्हापूर - करवीरनगरीत होणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे,सर्व गट-तट, हेवेदावे बाजूला सारून मराठा समाज अनेक वर्षांनंतर एकसंध झाला आहे. मराठा मोर्चाना समाजाच्या सर्वच थरांतील लोकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. लोकांनीच सहकुटुंब मोर्चात सहभागी व्हायचे ठरविल्याने कोल्हापूरचा मोर्चाही भव्य होणार आहे . जनतेने भव्य व शिस्तबद्ध मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्राला चांगला मेसेज द्यावा ,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .शिरोली नाका, , उचगाव, सरनोबतवाडी, शाहू नाका, कळंबा नाका, पुईखडी, फुलेवाडी, शिवाजी पूल, शिये नाका या मार्गांवरून नागरिक ताराराणी चौकात मोर्चात सहभागी होतील. या मार्गांवरील वाहनांचे पार्किंग त्याच परिसरात केले आहे. दसरा चौकात सर्व एकत्रित येणार असल्याने येथून चारीही दिशांना किमान 3 किलोमीटरच्या रांगा राहणार आहेत. त्या दृष्टीने पोलिस यंत्रणेने नियोजन केले आहे. एका पार्किंग स्टेशनला एक अधिकारी, तीन वाहतूक कर्मचारी व चार कॉन्स्टेबल तैनात करणार आहेत. मोर्चाच्या मार्गावर तीस ठिकाणी वॉच टॉवर उभारणार आहेत. ‘एफएम’वरून मोर्चाची माहिती तातडीने पुरवली जाणार आहे .
मोर्चा मार्ग सविस्तर आराखडा
शिये नाका ते दसरा चौक : शिये, अंबप, वाठार, किणी, वडगाव, वारणानगर, कोडोली, पारगाव, तळसंदे , सावर्डे, टोप, खोची, लाटवडे, संभापूर, हातकणंगले, कऱ्हाड, सातारा, इस्लामपूर : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान, संग्राम पाटील लेआउट, ताराराणी चौक, गोळीबार मैदान, राजाराम कारखाना वाहनतळ.
शिरोली नाका ते ताराराणी चौक : सांगली, मिरज, शिरोळ, जयसिंगपूर : रुईकर कॉलनी मैदान व परिसर, मार्केट यार्ड पाठीमागील रेल्वे गुड्स यार्ड, मुक्त सैनिक वसाहत परिसर, मुस्कान लॉन, रामकृष्ण लॉन.
शाहू नाका ते ताराराणी चौक : चंदगड, आजरा, कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज, बेळगाव व सीमाभाग, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, कणेरी, कंदलगाव, गिरगाव, कोगिल
उचगाव ते ताराराणी चौक : कुुरुंदवाड, अब्दुललाट, इचलकरंजी, हुपरी, रेंदाळ, खिद्रापूर, घोसरवाड, पट्टणकोडोली, मुडशिंगी, कर्नाटक सीमाभाग, सदलगा : विक्रमनगर, आय.आर.बी. हॉटेल मैदान, धान्यबाजार, जनावरांचा बाजार, उर्दू शाळा, महापालिका शाळा, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज परिसर.
सरनोबतवाडी ते ताराराणी चौक : गांधीनगर, वळिवडे, इचलकरंजी, उचगाव रोडवरून येणारी जादा वाहने : युको बॅँकेमागील पटांगण, राजाराम तलाव परिसर जागा, राजाराम तलावालगतच्या टॉवरशेजारील पटांगण, एच.पी. गॅस गोडावून परिसर, सरनोबतवाडी..
कळंबा नाका ते दसरा चौक : कळंबा, गारगोटी, बिद्री, चंदगड, मुदाळ तिट्टा, राधानगरी, करवीर, मुरगूड, कावणे, निगवे खालसा, शेळेवाडी, भुदरगड : शेंडा पार्क ते सायबर चौक मार्गावरील एक बाजू, कृषी मैदान शेंडा पार्क, तपोवन मैदान.
पुईखडी ते दसरा चौक : राधानगरी, वाशी, सडोली, परिते, घोटवडे, तारळे, कौलव, हळदी, कांडगाव, हसूर, करवीर : कृषी मैदान, शेंडा पार्क, तपोवन मैदान.
फुलेवाडी ते दसरा चौक : बालिंगा, दोनवडे, कळे, भामटे, बाजारभोगाव, बोरबेट, कोदे, कुडित्रे, खुपिरे, सांगरूळ, गगनबावडा, साळवण, धुंदवडे : तपोवन मैदान, दत्तमंदिर फुलेवाडी मैदान, फुलेवाडी अंतर्गत रोड, पी. एन. पाटील गॅरेज ते बोंद्रेनगर रिंगरोड.
शिवाजी पूल ते दसरा चौक : पन्हाळा, शाहूवाडी, आंबेवाडी, आसुर्ले-पोर्ले, केर्ली, मलकापूर, बांबवडे, सरुड, पिशवी, साळशी : पाटील समाधी परिसर, जयहिंद धाबा, पाटील पेट्रोल पंप, सोनतळी मैदान.