मराठा क्रांती मोर्चाचा वार
त्याला
सोशल मीडियाची धार
KOLHAPUR MH9LIVE REPORTER
मराठा क्रांती मोर्चाचाकडे पारंपरिक मीडियाने सुरुवातीचे काही मोर्च्यांकडे दुर्लक्ष केले. मीडिया हे कवर करत नसल्यामुळे आंदोलकांनी आधुनिक 21 व्या शतकातील सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा घेत आपले स्वतःचे असे मजबूत नेटवर्क उभारले व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या माध्यमाने मराठा आंदोलनाला जबरदस्त फायदा झाला आहे.हजारो मराठा स्वयंसेवक नेटकरी मोर्च्यासंबंधी संदेश पोहचण्याचे काम तर करतातच आणि मराठा समुदायाला यात सामील होण्यासाठी प्रेरितही करतात.15 ऑक्टोबरला कोल्हापूर येथे मराठा रॅलीदरम्यान पारंपारिक तुतारीचा निनाद सर्वत्र दुमदुमला जे मोर्च्यात सामील होऊ शकले नाही त्यांना ही याचा ध्वनी ऐकायला मिळाली आणि ती पण मोबाइलवर.लोकांनी थेट FM वर भाषणे ऐकली हे आंदोलन लीडरलेस आहे अर्थात याचा कोणीही नेता नाही. याची सूत्रे काही मराठा संस्थानांच्या हातात आहे ज्यांना सोशल मीडियाच्या महत्त्वाचा चांगलाच अंदाज आहे.कोणत्याही क्रांतीमध्ये संचार माध्यमाचा महत्त्व ओळखून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया सर्वात जलद मार्ग आहे सोशल मीडियाचे यश बघितल्यानंतर जे मीडिया हाउस आतापर्यंत मोर्च्यांकडे दुर्लक्ष करत होते ते ही मोर्चे कवर करत आहे. पण सोशल मीडिया असताना आता पारंपरिक मीडियाची गरज नाही.