KOLHAPUR MH9LIVE REPORTER -
पद्मनाभ स्वामी मंदिर भारतातील केरळ राज्याची राजधानी तिरुअनंतरपुरममध्ये आहे.हे शहर देश-विदेशाला हवाईमार्गाने जोडले आहे. तसेच देशातील मुख्य हायवेमार्गांनाही जोडले गेले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिर हे विष्णूच्या भक्तांसाठी मोठी पर्वणीच ठरत आहे. या मंदिराला एक ऐतिहासिक कथा ही आहे. येथे सर्वप्रथम भगवान विष्णूची मूर्ती प्रकट झाली होती. यानंतर येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली.या मंदिरातील सोन्याच्या खजिना असलेल्या तळघरांमुळे हे मंदिर जास्तच प्रसिद्धी झोतात आले आहे या मंदिराचे पुन्हा बांधकाम करताना अनेक गोष्टींकडे लक्ष देण्यात आले होते. हे मंदिर भव्यदिव्य असून यातील मूर्तीही डोळ्यांचे पारणे फेडणारीच आहे. दक्षिण भारतीय वास्तुकलेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
यातील वास्तुशिल्प हे द्रविड आणि केरळच्या शैलीची ओळख करुन देते. गोपुरम द्रविड शैलीमध्ये हे मंदिर बनविले आहे. गोपुरम ३० मीटर उंच असून याचा परिसरही खूप मोठा आहे. येथे एक मोठा सरोवर असून त्याला पद्मतीर्थ कुलम म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णूची मूर्ती आहे. यांच्या दर्शनासाठी लाखो भक्त दुरुन येतात. सहामुखी नागावर विष्णू शयन मुद्रेत विराजमान आहे. यामुळे तिरुअनंतपुरमचे नावही यामुळेच पडल्याचे बोलले जाते.
दर्शन वेळ
Morning |
03.30 am to 04.45 am (Nirmalya Darshanam) 06.30 am to 07.00 am 08.30 am to 10.00 am 10.30 am to 11.10 am 11.45 am to 12.00 Noon |
Evening |
05.00 pm to 06.15 pm 06.45 pm to 07.20 pm |