Kolhapur mh9live report ज्ञानराज पाटील
सध्या चायनीय खाद्यपदार्थाची चलती आहे. त्याचबरोबर या पदार्थाच्या विक्रेत्यांच्या संख्येतही वाढ होत असून हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी चायनीज हॉटेल्स आणि हातगाडयांवर गर्दी केली जात आहे. मात्र, हे चायनीज पदार्थ अतिचविष्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणा-या ‘अजिनोमोटो’ ही पावडर आरोग्याला घातक असल्यामुळे या पावडरचा वापर करण्यावर तत्काळ बंदी घालण्यात यावी
शाळकरी मुलेही या चायनीज भेळची , राइस , मंचुरिअन , चिकन ६५ ची शौकीन झाली आहेत. मात्र हे चायनीज पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये ‘अजिनोमोटो’ या पावडरचा वापर केला जातो. ही आगळी चव चाखण्यासाठी तसेच या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण गर्दी करत असतात. मात्र, ही पावडर आरोग्यास अतिशय घातक व शरीराला हानिकारक आहे. परंतु हे पदार्थ खाणा-यांना मात्र या होणा-या दुष्परिणामांची माहिती नसते. त्यामुळे कालांतराने त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊन अनेक आजारांना सामोरे जावे लागते,
दुष्परिणाम काय?
>शरीरावर विपरीत परिणाम
>हाडे ठिसूळ होणे
>अनावश्यक कॅलरीज वाढणे