Kolhapur mh9Live Reporter
सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरु असताना , ज्यांच्या अमुल्य त्याग , देशरक्षणामुळे आपण दिवाळी आनंदात साजरी करु शकतो अशा भारतीय सैनिकांना
चिमुकल्यानी पत्राद्वारे दिपावली शुभेच्छा सन्देश लिहून पाठवले
सैनिका आम्हा तुजा अभिमान..अशा भावना पत्राद्वारे व्यक्त करत उमेद फौंडेशन सेवा परिवार व विद्या मंदिर आंबर्डे ता शाहूवाडी जि कोल्हापूर यांनी संयुक्तपणे राबवलेल्या उपक्रमात चिमुकल्यानी आंबर्डे गावातील भारतीय सैनिकांचे पत्ते जमा करून त्यांना दिपावली निमित्त त्यांच्या त्याग व शौर्याबद्दल अभिमान व्यक्त करणारे ,दिवाळी निम्मित शुभेच्छा देणारे संदेश पत्राद्वारे पाठवले..
त्या पत्रावर त्यांनी नाजूक सुंदर हातांनी दिपावली संदेश देणारे सुंदर चित्र रेखाटले..!
यावेळी विद्या मंदिरआंबर्डे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम, बी डी पाटील सर , जेडगे सर, कांबळे सर व प्रकाश गाताडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले..