EBC सवलत मर्यादा 6 लाख - देवेंद्र फडणवीस
KOLHAPUR MH9LIVE REPORTER
मराठा क्रांती मोर्च्याला मिळणार भरघोस आणि उस्फुर्त प्रतिसाद पाहता मुख्यमंत्र्यांनी महत्वाचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला .आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी ईबीसी सवलतीसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी होती. अडीच लाखांपेक्षा जास्त परंतु सहा लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या गुणवंत मुलांनाही या सवलतीचा लाभ मिळणार असून त्यांचे निम्मे शिक्षण शुल्क राज्य शासनाकडून भरण्यात येणार आहे. यासाठी मात्र संबंधित विद्यार्थ्यास बारावी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणं गरजेचं आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना सवलत आता खुल्या गटातील आर्थिक मागास घटकांनाही मिळणार आहे.