लसणाचे औषधी उपयोग
- जंतांची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींनी रोजच्या आहारात लसूण अंतर्भूत करणे उत्तम असते. तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलाला मात्र लसूण न देणेच श्रेयस्कर असते.
- भूक न लागणे, तोंडात कफाचा चिकटपणा जाणवणे, जीभ जड झाल्यासारखी वाटणे या विकारांमध्ये वरील पद्धतीने शुद्ध केलेला लसूण, आले, काळे मीठ यांचा ठेचा थोडा थोडा खाता येतो.
- थंडी लागल्यामुळे किंवा सर्दी झाल्यामुळे कान दुखणे, दडा बसणे अशा त्रासांमध्ये लसणाची पाकळी सोलून कापसात गुंडाळून कानात ठेवण्याचा उपयोग होतो.
- लसूण मोडलेले हाड सांधण्यास मदत करणारा आहे म्हणून हाड मोडले असता प्लास्टर वगैरे केले तरी बरोबरीने आहारात लसणाचा अंतर्भाव करणे चांगले असते. ज्या ठिकाणी प्लास्टर घालता येत नाही त्या ठिकाणी लसूण व गव्हाचे पीठ एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचा लेप लावून ठेवण्याचा उपयोग होतो.
- जुनाट जखमेतून मधून मधून पाणी येणे, पू येणे, जखमेतून चित्रविचित्र गंध येणे असे त्रास होत असतील तर लसूण बारीक करून जखमेवर लेप करण्याचा उपयोग होतो. मात्र, बरोबरीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.
- लसणाचा कांदा किंवा रोप घरात ठेवल्याने घरातील हवा शुद्ध होण्यास मदत मिळते, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यास मदत मिळते.
अशाप्रकारे लसूण अनेक प्रकारे वापरता येतो. मात्र, गर्भवती स्त्रिया, लहान बालके, पित्तदोष वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्ती, शरीरात कुठेही दाह होणाऱ्या व्यक्ती यांनी लसूण जपून खावा़