Kolhapur mh9Live Reporter संकलित
अमेरिकेतील यशस्वी मराठी उद्योजक...!!!
डॉ.सुहास पाटील..!!!
मराठी लेकांनी नोकरिच्या मानसीकतेमधुन बाहेर पडुन नोकरी व्यवसायाच्या किंवा बिझिनेसच्या मानसिकतेमधे शिरावे या दृष्टिने माझा थोडा फार प्रयत्न चालु आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणुन असे यशस्वी मराठी उद्योजक, की ज्यांची माहिती अजुनपर्यंत लोकांना नाही, शोधुन काढुन त्यांच्या यशोगाथा आपल्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. मराठी लोकांनी यांच्यापासुन स्पुर्ती घ्यावी व आपल्यामधे तसेच आपल्या मुलाबाळांमधे उद्योग व्यवसायाची मानसीकता निर्माण करण्याच्या प्रयत्नाला सुरवात करावी येव्हडीच माझी माफक अपेक्षा आहे.
डॉ.सुहास पाटील हे अमेरिकेतील एक आघाडिचे, प्रतिष्ठीत व आदरणीय असे भारतीय व त्यातुनही मराठी उद्योजक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी स्थापन केलेली ' सीरस लॉजीक ' ( Cirrus Logic ) ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीमधील एक आघाडिची कंपनी म्हणुन ओळखली जाते.
डॉ.पाटील यांचा जन्म 1944 साली जमशेदपुर( झारखंड ) येथे झाला. लहान पणापासुनच त्यांना सायन्सची आवड होती. त्यांच्या वडिलांचा रेडियो रिपेअरींगचा साईड बिझिनेस होता त्यामुळे हे घडले असावे. केमिस्ट्री हा त्यांचा आवडिचा वीषय होता व त्यांनी शाळेत असतानाच घरी एक छोटी केमीकल लॅब पण काढली होती. त्यावेळी त्यांना पॉप्युलर मेकॅनीक हे मासीक फार आवडायचे. या मासिकात काय लिहिले आहे हे समजावे म्हणुन त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास करुन त्यावर प्रभुत्व मीळविले.
1965 साली आय. आय. टी. खरगपुर येथुन बी. टेक. झाल्यावर ते उच्च शीक्षणासाठी अमेरिकेत आले. 1970 ते 1975 पर्यंत ते एम.आय.टी मधे असिस्टंट प्रोफेसर म्हणुन काम करत होते. मग उटाह युनिव्हर्सिटिच्या इंजिनीयरींग कॉलेजमधे त्यांनी असोसीएट प्रोफेसर म्हणुन काम केले. त्यांनी 1981 साली सॉल्ट लेक सिटी येथे पाटील सिस्टीम्स या कंपनिची स्थापना केली. याच कंपनिचे रुपांतर पुढे सीरस लॉजीक मधे झाले. मग ते सिलिकॉन व्हॅलीत आले. ते अजुन काही महत्वाच्या कंपन्यांचे डाररेक्टर आहेत. तसेच सॅन ओजे ( San Jose ) येथील टेक्नीकल म्युझियमचे डाररेक्टर पण आहेत. हे टेक्नीकल म्युझीयम अमेरिकेतील सर्वोकृष्ट टेक्नीकल म्युझीयमपैकी एक म्हणुन ओळखले जाते.
ते दानशुर म्हणुन पण ओळखले जातात. त्यांनी एम.आय.टी ला 15 लाख डॉलर्सची तेथील स्टाटा सेन्टरच्या उभारणिसाठी देणगी म्हणुन दिले आहेत. तसेच भारतातुन अमेरिकेत आलेल्या लोकांनी उद्योग व्यवसायात शिरावे म्हणुन ते प्रयत्नशील असतात.
शिक्षण क्षेत्रातुन आलेल्या डॉ. सुहास पाटील यांनी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात यशस्वी उद्योग व्यवसाय उभारुन सर्व भारतियांची, व विशेषतः मराठी माणसांची मान अभिमानाने उंच केली आहे.