Kolhapur mh9Live Reporter
महाराष्ट्र गेरेजमध्ये कार दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक दोन युवक आले , मिस्त्री तुम्हाला हेलिकॉप्टर दुरूस्त करायचे आहे असे म्हणू लागले , युसुफ मिस्त्रीना वाटले चेष्टा करत असतील मग ते म्हणाले , घेऊन या , करुया दुरूस्त पण युवकानी पटवुन सांगितले खरोखरच एका बड्या असामीचे हेलिकॉप्टर किरकोळ तांत्रिक कारणाने नादुरूस्त झाले आहे , प्रयत्न करा
युसुफ मिस्त्रीना हेलिकॉप्टरचे कोणतेही ज्ञान नसताना पायलटच्या सांगण्यानुसार कार दुरूस्तीच्या साध्या हत्यारानीच किरकोळ बिघाड होता तो काही मिनिटातच दूर केला , हेलिकॉप्टरच्या उड्डाणामधील अडथळा दूर झाला नाहीतर या कामासाठी मुंबईहुन खास मेकेनिक मागवावा लागणार होता , यामध्ये वेळ व पैसा वाया गेला असता
कोल्हापुर ही पुर्वीपासुनच उद्यमनगरी आहे , येथे हरहुन्नरी अवलिया कारीगर भेटतात त्यात यूसुफ मिस्त्रीची भर पडली आहे , येथील कारीगर कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत फक्त गरज आहे संधी देण्याची !