आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून 19 लाख रुपये निधीतून राजाराम बंधारा रस्ता काँक्रिटीकरण , पिलर दुरुस्ती , रेलिंग बसवणे आदी कामे होणार आहेत..या कामाचा शुभारंभ युवा नेते ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला . यावेळी नगरसेवक मोहन सालपे, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक सुभाष बुचडे, मदन जामदार व राजाराम बंधारा ग्रुपचे सदस्य आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
राजाराम बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. यामार्गावरुन कसबा बावडा ते जोतिबा, पन्हाळा, वडणगे, निगवे अशी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. यापूर्वी या बंधाऱ्यावरील अपघातात कित्येक दुर्घटना घडल्या आहेत. या रस्त्याची डागडुजी करावी ही जनतेची मागणी लक्षात घेऊन आ. सतेज पाटील यांनी लोकांना दिलासा दिला आहे.
या बंधाऱ्यावरील वरील सद्या असलेले काँक्रीट खराब झाले आहे. ते काढून पूर्ण नवीन काँक्रीट करावे लागणार आहे . याकरिता सुमारे 1 महिना बंधाऱ्यावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे