Tuesday, 24 April 2018

mh9 NEWS

राज्य प्राथमिक शिक्षक संघ औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार 


कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. २४/४/१८

        मिलींद बारवडे

   प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात दुरुस्ती करावी यासह राज्यस्तरीय विविध मागण्यासाठी दि २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांनी मोठया संख्येनी या मोर्चात सहभागी व्हावे. असे आवाहन शिक्षक नेते मोहन भोसले यांनी केले आहे. अशी माहिती शिक्षक संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

       महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा दि. १७ रोजी शरद अध्यापक विद्यालय पुणे येथे घेण्यात आली होती. या महामंडळ सभेत दि. २७ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये राज्य शासनाने जे बदली धोरण जाहीर केले आहे. त्या बदली धोरणामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने या धोरणात बदल करावा या सह विविध मागण्यासाठी  परळीच्या तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण निवडणूक आयोगाच्या दि. २० च्या पत्रान्वये उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेची निवडणूक जाहीर केल्याने बीड जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्यामुळे परळी ऐवजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

     शिक्षक संघाचे नेते मा. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या मोर्चात राज्यभरतील प्राथमिक शिक्षक सहभागी होणार असून मोर्चा क्रांती चौकातून निघणार आहे. 

मोर्चातील प्रमुख मागण्या बदली धोरणात बदल करून शिक्षकांच्या बदल्या सेवाजेष्टतेनुसार तालुका अंतर्गतच करण्यात याव्यात. प्रशासकीय बदल्याची टक्केवारी असावी, बदल्याची खो पद्धती बंद करण्यात यावी, एकदा बदली झाल्यावर पुन्हा ५ वर्षे बदली करण्यात येवू नये ,विनंती बदल्या मागणी नुसार कराव्यात या दुरुस्ती सुचवण्यात आल्या आहेत. 

 तसेच दि.२३/१०/२०१७ च अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून १२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात यावी. 

१ नोवेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकासह सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासन निर्णयाप्रमाणे ३० सप्टेंबर च्या पट संख्येनुसार शिक्षक पदनिर्धारण करावे. सातवी पर्यंतच्या सर्व प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक व सामाजिक शास्त्र विषयाचे पदवीधर शिक्षक पद मान्य करावे, सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची श्रेणी देण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या १०० टक्के विध्यार्थ्यांना मोफत गणवेश  देण्यात यावा, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ देवून सुरु केलेली वसुली थांबवण्यात यावी, पट संखेअभावी राज्यातील बंद केलेल्या प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात, अंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया जलद राबवून त्वारिक कार्यवाही पूर्ण करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मोर्चात करण्यात येणार आहे.

    तरी या राज्यस्तरीय मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमीक शिक्षकांनी हजारोच्या संख्येंने सहभागी व्हावे . महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचीटनिस अप्पासाहेब कुल, महिला आघाडी प्रमुख श्रीमती अनुराधा तकटे,  नेतृत्व --- कोषाध्यक्ष जनार्दन नेऊंगरकरे कार्यकारी अध्यक्ष एन वाय पाटील , शिक्षक नेते मोहन भोसले आदी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व उपनेते रघुनाथ खोत जिल्हा मार्गदर्शक जीवन मिठारी दिनकर पाटील आनंदराव जाधव,दयानंद पाटील, सुरेश कांबळे,सुहास शिंत्रे मधुकर येसणे ,बाळासाहेब निंबाळकर ,प्रकाश खोत, सुनील एडके ,प्रकाश सोहनी . अशोक चव्हाण, अशोक लंबे ,अशोक वसगडे, इंद्रजीत कदम, हेमंत भालेकर ,संभाजी पाटील, तानाजी जत्राटे ,अशोक पाटील ,जयसिंग पाटील, प्रकाश येडगे ,विक्रम पोतदार.जिल्हाअध्यक्ष रविकुमार पाटील सरचिटणीस सुनील पाटील, कार्याध्यक्ष दुंडेश खामकर,  बाळकृष्ण हळदकर,कोषाध्यक्ष अरुण चाळके,प्रसिद्धी प्रमुख किरण शिंदे आदी पदाधिकारी करणार आहेत.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :