पेठ वडगांव
विद्यार्थी वर्गाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व भाषा अवगत कराव्यात, त्यांनी भाषेच्या माध्यमातून जगभर पोहचावे, इंग्रजी व जापनीज यासारख्या भाषेतून विविध क्षेत्रात करिअर करावे असे प्रतिपादन जपानचे वाणिज्य दूतावास सदस्य श्री युकिओ उचिदा यांनी डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅॅशनल स्कूलमध्ये ‘‘जापनीज भाषेचे महत्व व करिअर’’ या विषयावर बोलताना केले. मंगळवार दि. 10.04.2018 रोजी ‘जापनीज भाषेचे महत्व व करिअर’ या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पुढे त्यांनी विद्या्यार्थ्यां जपान संस्कृती, जपानची भौगोलिक स्थिती, जापनीज भाषेचे महत्व, त्यातून करिअर कसे करावे याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी दशेतच विद्या्यार्थ्यांना भाषेची आवड कशा प्रकारे निर्माण करावी यांची सविस्तर माहिती दिली. डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅॅशनल स्कूलमध्ये गेली चार वर्षे जापनीज भाषेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. जापनीज भाषा ही सोपी व सहज असून अवगत झाल्यास व्यक्तीमत्व विकास घडविण्यास या भाषेचे महत्व आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पूनावाला स्कूलमध्ये जापनीज भाषेचे प्रशिक्षण दिले जाते हे पाहून त्यंानी विद्याथ्र्याच्या जापनीज भाषेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील षिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ‘जपान देश व त्याची प्रगती जगाच्या नकााशवर कोरलेले नाव, त्याचबरोबर भारत व जपान सहसंबंध यांची विषेष माहिती सांगून जापनीज भाषा अवगत करून स्वतःचे करिअर करावे असे त्यांनी प्रतिपादन व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना श्री. गुलाबराव पोळ म्हणाले की, आम्ही विद्या्यार्थ्यां आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याच्या अनुषंगाने प्रयत्नषील असून जापनीज सारख्या भाषेतून ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय जगताातील ओळख निर्माण करून देत आहोत. इंग्रजी बरोबरच जापनीज सारख्या भाषेतून विद्याथ्र्याना प्रबोधीत केले जाते असे सांगून सर्व विद्या्यार्थ्यां ही भाषा अवगत करावी व स्वतःचा विकास साधावा असे मत त्यांनी व्यक्त केले व जापनीज भाषा अवगत केलेल्या विद्याथ्र्याचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पुजनाने झाली तदनंतर जापनिज भाषेची माहिती सांगणा-या भित्तीपत्रिकेचे मान्यवरंाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. युकिओ उचिदा यांचा सत्कार सन्माननीय श्री.गुलाबराव पोळ यांच्या हस्ते करण्यात आला तदनंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये कु. पार्थ तिवारी, कु. अंगज शर्मा, कु. सृष्टी फरांदे, कु. स्पृहा पाटील, कु. भैरव चैथमल या विद्याथ्र्यानी भाषणे सादर केलीत. तदनंतर भारतीय संस्कृृतीचे दर्शन घडविणारे आकर्षक नृत्य सादर करण्यात आलीत तसेच जपानबद्लची माहीती, जापनीज नृत्य, सिद्धार्थ ते बुद्ध ही नाटीका व विविध देशांचे समिश्र डान्स सादर करून विविधतेतून एकता हा संदेश देण्यात आला. त्यानंतर जपान या देषावर आधारीत चित्रफित दाखविण्यात आली. यामध्ये जपान या देषाला ‘उगवत्या सुर्याचा देश’ म्हणून का संबोधले जाते तसेच जपानी संस्कृती, परंपरा, उत्सव, पोषाख, आहार, खेळ यासह जपानने केलेली प्रगती यातून दाखविण्यात आली. यामध्ये विद्याथ्र्यानी भारत-जपान संस्कृती, शिक्षण क्षेत्रातील जपान, राजकिय, सामाजिक, खेळ, तंत्रज्ञान या संबधीत प्रश्न विचारले. विद्याथ्र्यानी विचारलेल्या विविध प्रश्नांचे /शंकाचे निरसन मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जापनिज भाषेचे शिक्षक श्री. कृष्णाजी केसकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री मारूती कांबळे व आभार प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांनी मानले. भारताच्या व जपानच्या राष्ट्रगीत ने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ, स्कूलचे संचालक डाॅ. सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर, जापनीज भाषेचे मार्गदर्शक श्री कृष्णाजी केसकर, एक्स एल जे. ई.ई चे संचालक श्री.शैलेश नामदेव, ए.एफ.पी.आय. चे संचालक श्री.घनशाम सिंघ, ए.एफ.पी.आय. चे संचालक मेजर चंद्रसेन कुलथे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षक पालक संघाचे सदस्य, विद्यार्थी व पालक उल्लेखनिय संख्येने उपस्थित होते.