Monday 2 April 2018

mh9 NEWS

भाजप राज्यात समाधानी असणारा एक माणूस सापडणार नाही --- सरकार उलथावण्यासाठीच हल्लाबोल: धनंजय मुंढे


फोटो :  मुरगुड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  अजितदादा पवार मंचावर सुनील तटकरे,  आम हसन मुश्रीफ आदी.


मुरगुड प्रतिनिधी ( समीर कटके )

         " अच्छे दिन हमारे गले कि हड्डी बन गयी है. अच्छे दिन आते नही उन्हे मेहसुस करना पडता है" असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी भाजप आणि मोदी यांच्या जुमलेबाजीचा खरपूस समाचार घेतला भाजप मंत्री नेत्यांच्या शिवाय इतर कोणाच्याही जीवनात अच्छे दिन आले नाहीत अशी टीका त्यांनी केली.

     मुरगुड ता कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत ते बोलत होते. पक्षनेते अजितदादा पवार, सुनील तटकरे, आम हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. श्री मुंढे यांच्या उपस्थिती बद्दल नागरिकांच्यात मोठी उत्सुकता होती त्यांचे भाषण ऐकण्यासाठी पाच तालुक्यातील नागरिक आले होते.

आपल्या मनोगतात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे म्हणाले सोशल मीडियावर मोदींचा वाढदिवस 1 एप्रिल रोजी साजरा झाला पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून

जनतेचे रोज एप्रिल फुल होत आहे. या सरकार आल्या पासून राज्याचे वाटोळे लागले आहे. रोज एक स्वप्न दाखवले. मोदी सत्तेवर येताना "विदेश जाउंगा, कालाधन लाउंगा और हर एक के खातेमे पंद्रह लाख डालुंगा असे सांगत होते पण आजतागायत पंधरा पैसेही आले नाहीत" असा टोला त्यांनी लगावला. "  बहोत हो गयी मेहंगाई कि मार, अब कि बार मोदी सरकार अशी घोषणाबाजी करणाऱ्यांच्या राज्यात 50 रुपयांचे पेट्रोल 82 रुपये, 200 रुपयांचा गॅस 800 रुपये तर 70 रुपयांची डाळ 300 रुपयांवर गेली हेच का अच्छे दिन असा प्रश्न त्यांनी केला.हल्लाबोल यात्रेचा पाचवा टप्पा संपे पर्यंत भाजप सरकारही शिल्लक राहणार नाही असा दावा त्यांनी केला. शेतीमालाला दिढ पट हमी भाव देणार, संपूर्ण कर्जमाफी, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजास आरक्षण देणार, 6 कोटी रोजगार देणार अशी आश्वासने देऊन सत्तेवर आलात आणि फसवलं या खोटारडेपणाच्या विरोधात हे आंदोलन आहे अशी टीका त्यांनी केली.

     शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मुख्यमंत्री म्हणतात मी पाच पिढ्यांचा शेतकरी आहे त्यांची खिल्ली उडवताना मुंढे म्हणाले हा माणूस उभ्या आडव्या कोणत्याही अँगलने शेतकरी दिसत नाही. गायीची धार काढून दाखवा आणि तुम्ही शेतकरी असल्याचे सिद्ध करा तुम्हाला वाकता येत नसेल तर गाय टेबलवर उभी करतो असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलेले शब्द पाळता येत नसतील त्यांची थट्टा करू नका. भाजप सरकारच्या काळातील सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख त्यांनी केला. पंधरा वर्षाच्या नवसाने पोर जन्मले पण मुक्के घेऊन मारलं अशी सरकारची अवस्था असून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुक्क्यांनीच हे सरकार संपेल. जनतेचा आवाज त्यांचा संताप या हल्लाबोल यात्रेतून सर्व महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे असेही ते म्हणाले.


मुश्रीफानी मैदान जिंकले......


नेटके नेत्रदीपक संयोजन, यशस्वी जंगी सभा, 35 हजारावर नागरिक कार्यकर्त्यांची उपस्थिती यामुळे आम मुश्रीफ यांचे पवार तटकरे व इतर उपस्थित नेते विधिमंडळातील सहकारी प्रभावित झालेले दिसले. अजितदादांनी त्यांचा उल्लेख कागलचा ढाण्या वाघ असा केला त्याच क्षणी लोकांनी  खूप मोठा जल्लोष करून दाद दिली. सर्वच वक्त्यांनी मुश्रीफांचा उल्लेख करताच असा जल्लोष होत राहिला.


मुश्रीफ केवळ कोल्हापूरचे नव्हेत....


प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे म्हणाले कोल्हापूर प्रमाणेच राज्याच्या समोरील प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळात आम्हाला मुश्रीफ हवेत त्यासाठी जिल्ह्यातील लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे रहावे. मुश्रीफ बळकट झाले तर अजितदादा, सुप्रियाताई आणि देशाचे नेते शरद पवार यांचे हात बळकट होणार आहेत त्यांच्या या वक्तव्यावर सभामंडप जल्लोष, आरोळ्या, टाळ्या आणि शिटानी भरून गेला.




स्वागत प्रविणसिंह पाटील यांनी केले. प्रास्ताविक आम हसन मुश्रीफ यांनी केले. आभार शिवानंद माळी यांनी मानले सभेस आम जयदेव गायकवाड, आम शशिकांत शिंदे, आम प्रकाश गजभिये, निवेदिता माने, चित्रा वाघ, के पी पाटील,  भैय्या माने, युवराज पाटील,गणपतराव फराकटे, ए वाय पाटील, अजिंक्य राणा पाटील, ईश्वर बाळबुद्धे,  सतीश पाटील, संग्राम कोते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, नाविद मुश्रीफ उपस्थित होते. सूत्र संचालन विवेक गवळी यांनी केले.  आभार शिवानंद माळी यांनी मानले.



mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :