प्रतिनिधी सतिश लोहार **
दहावी पाठयपुस्तक नवीन अभ्यासक्रम , नवीन झालेले बदल , नवीन पुस्तकाची माहिती यासाठी ताराराणी विदयापीठ डी एड कॉलेज, कोल्हापूूर या ठिकाणी सर्व विषयांची प्रशिक्षण सुरू आहेत , यामध्ये गणित विषयाच्या प्रशिक्षणात उल्लेखणीय बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मा . श्री किरण लोहार साहेब यांनी प्रशिक्षणास भेट देऊन शिक्षकांना गणित विषयाचे मनोरंजक पध्दतीने शिक्षकांच्यात मिसळून विविध विषयात चर्चा घडवून आणून सध्याची परिस्थिती , गणिताचे विदयार्थ्याना ज्ञान केंद्रीत अध्यापन, यावर मोलाचे मार्गदर्शन शिक्षणअधिकारी मा . श्री किरण लोहार साहेबांनी केले . गणित विषय राज्य अभ्यास गटाचे सदस्य , लेखक मा. श्री आण्णाप्पा परीट सर यांनी प्रशिक्षणास भेट देऊन नवीन अभ्यासक्रम बदल , नवीन घटकाचे अध्यापन करत असताना अध्यापनात कृतीचा वापर करून त्याचे पूर्वज्ञान जागृत करणे , विदयार्थ्यांना गणिताची आवड रुची , कशी निर्माण करता येईल, विविध मुद्दे घेऊन त्यावर मार्गदर्शन केले .
गणित विषयातील तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा .श्री.व्ही.के.पोतदार सर, मा श्री पी.एस.शिंदे सर, मा . श्री व्ही.व्ही.पाटील सर . तज्ञ वर्गसमन्वयक _ मा .श्री एम .आर. पाटील सर यांचे प्रशिक्षणास मार्गदर्शन लाभले ,DIECPD चे आदिव्याख्याते : सौ.विद्या कदम, श्री.लोंढे सर, प्रशिक्षणास उपस्थित होते , या प्रशिक्षणास मार्गदर्शन लाभाणाऱ्या तज्ञांचे सर्व शिक्षकांच्या वतीने मा . श्री अरविंद मगदूम सर यांनी आभार मानले .
1 comments:
Write commentsvery good News Editing..
Reply