फोटो - सेनापती कापशी (ता - कागल) येथे ऐतिहासिक स्वामी चौकातील शिवजन्मोत्सव मिरवणुक.
सेनापती कापशी / वार्ताहर - अवधूत आठवले
सेनापती कापशी (ता - कागल) येथे ऐतिहासिक स्वामी चौक येथे गावातील राजा शिवछत्रपती ग्रुप, सेनापती कापशीकर, श्री शिवप्रतिष्ठान, नवयुग मंडळ व गावातील सर्व तरुण मंडळे व शिवप्रेमी एकत्र येऊन पारंपरिक वाद्य ढोल ताशासह मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला .गावात सगळीकडे या तरुण मंडळांनी भगवे झेंडे, पताका लावल्या होत्या सगळीकडे जय भवानी जय शिवाजी,शिवाजी महाराज की जय अशा जयघोषाने कापशी नगरी दुमदुमुन वातावरण शिवमय झाले होते.
सकाळी 8 वा भुदरगडाहून शिवज्योत आणण्यात आली. यानंतर 9 वा श्री मूर्ती अभिषेक करण्यात आला. ठीक 12 वा शिवजन्मकाळ सोहळा महिलांनी पाळणा म्हणत साजरा केला. सायंकाळी 7 वा ऐतिहासिक स्वामी चौकातून मिरवणुकीला सुरवात झाली येथून शिवाजी चौकातून संताजी चौक येथे मिरवणूक आणण्यात आली व तेथे ढोल व ताशांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली कापशी व कापशी परिसरातील शिवप्रेमींनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी पावसाला अचानक सुरवात झाली तरीही शिवप्रेमींचा उत्साह या मिरवणुकीत पाहण्यासारखा होता.
दरम्यान, शिवजयंती निमित्त बुधवार दि 18 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी 7 वा राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा डॉ गजानन वाव्हळ पुणे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.