सिद्धनेर्ली (वार्ताहर)आजही ग्रामीण भागात महिलांना चुलीवर जेवण बनवावे लागते त्यामुळे चुलीच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे अनेक आजार होत आहेत यावर एक उपाय म्हणजे गॅस वर जेवण बनवणे होय त्याच बरोबर लागणारा वेळेची बचतही होते ,प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस वापरला जावा यासाठी शासनाच्या अनेक योजना देखील असून त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर पर्यन्त देखील करत आहे असे प्रतिपादन एलपीजी गॅस कंपनीचे सिनियर मॅनेजर राजीव नरुला यांनी केले ते सिद्धनेर्ली ता कागल येथे उज्वला गॅस योजनेच्या कार्यक्रमा
च्या निमित्ताने बोलत होते.
पुढे बोलताना राजीव नरुला म्हणाले गॅस जेवणासाठी वापरल्या मुळे जेवण करताना वेळेची बचत होऊन जेवण स्वच्छ बनवता येते त्याच बरोबर गॅस वापरताना काळजीही तितकीच घेतली पाहिजे असेही ते बोलताना पुढे म्हणाले.
या वेळी कार्यक्रमाचे स्वागत सरपंच सौ नीता युवराज पाटील यांनी केले तर प्रास्ताविक उज्वला पोवार यांनी केले .यावेळी या कार्यक्रमासाठी माजी सरपंच पुष्पलता मगदूम,बळीराम मगदूम, सोपान घराळ ,युवराज पाटील,बाबासो कांबळे ,सौ श्वेता कांबळे तसेच गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .
फोटो -उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन वाटप करताना राजीव नरुला ,सोबत नीता पाटील, बळीराम मगदूम, सचिन पाटील आदी