मौजे वडगांव येथे सपोनि परशुराम् कांबळे मार्गदर्शन करतांना शेजारी सरपंच काशीनाथ कांबळे,अमिर हजारी, सुरेश कांबरे, प्रताप रजपूत
हेरले / प्रतिनिधी दि. २/४/१८
शिवजयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत असतांना सर्वांनी कायदा व सुव्यस्थेचे पालन करावे.असे मत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि परशुराम कांबळे यांनी व्यक्त केले.
ते मौजे वडगाव ( ता. हातकणंगले) येथे शिवजयंती व डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या मंडळाच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलिस पाटील आमिर हजारी होते .
सपोनि कांबळे पुढे म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातील महान व्यक्ती असून युगपुरुष म्हणून मानले जातात . त्यामुळे डॉल्बी तसेच कर्णकर्कश वाद्य न लावता या युगपुरूषांचे विचार सर्वसामान्य लोकांच्या जिवनात एक आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीने साजरी करावी. त्याचबरोबर शिवाजी महाराज व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावरिल पोवाडे ' भारूड गीते, व्याख्याने अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे काम तरुण मंडळांनी करावे.त्याच बरोबर मिरवणुकीमध्ये दारू पिणे, हुल्लडबाजी करणे, तसेच पोलिसांच्या बरोबर वादावादी करणे अशा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचेही ते यावेळी त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पोलीस पाटील आमिर हजारी शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे यांनी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी सरपंच काशीनाथ कांबळे , उपसरपंच किरण चौगुले शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे ग्रा पंसदस्य अवधूत मुसळे माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रताप रजपुत नितिन घोरपडे , दत्ता कांबळे पो.कॉं विजय पाटील श्रवणकुमार चौगुले प्रविणकुमार चौगुले ,अनंत जाधव यांच्यासह शिवजयंती व डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी शिवसैनिक , भिमसैनिक व ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.