हेरले / प्रतिनिधी
संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा संजय घोडावत पॉलीटेक्निक,अतिग्रे यांनी आयोजित केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धा संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या बिल्डींगमध्ये होणार आहेत.
जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात ही स्पर्धा होणार आहे. सर्व स्पर्धकांना नऊ फेऱ्या खेळावयास मिळणार आहेत.रविवारी सकाळी नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर साडेनऊ वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.कोल्हापूर,सांगली,इचलकरंजी, सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सोलापूर,पुणे,मुंबई,बेळगाव,हुबळी व गोवा येथील नामवंत बुद्धिबळपटूना आमंत्रित करण्यात आले आहे. साधारण अडीचशे बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
स्पर्धा विजेत्यांना एकूण रोख ५१ हजार रुपयांची ५१ बक्षिसे चषक व मेडल्स सह खुल्या व विविध वयोगटात ठेवली आहेत.खुल्या गटातील २१ बक्षिसे पुढीलप्रमाणे विजेत्यास रुपये ७,०००/- व चषक उपविजेत्यास रुपये ५,०००/- व चषक तर तृतीय क्रमांकास रुपये ३,०००/- व चषक आहे.क्रमांक चार ते नऊ अनुक्रमे रु.२,०००/- ; रु.१,०००/- ; रु.९००/- ; रु.८००/- ; रु.७००/- ; रु.६००/- क्रमांक दहा ते एकवीस प्रत्येकी रुपये पाचशे व मेडल याशिवाय वयोगट ९,११,१३ व १५ वर्षाखालील उत्कृष्ट मुले, उत्कृष्ट महिला व उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू या प्रत्येक गटातील पाच उत्कृष्ट बुद्धिबळपटूना १)रु.१,५००/- ; २) रु.१,०००/- ; क्रमांक ३ ते ५ प्रत्येकी रु.५००/- व मेडल उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून ठेवले आहे.ह्या व्यतिरिक्त विशेष उत्तेजनार्थ म्हणून चषक व मेडल्स दिली जाणार आहेत.सर्व स्पर्धकांना चहा,नाश्ता व जेवणाची मोफत सोय केली आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाचशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी आपली प्रवेश फी शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी पर्यन्त गुगल पे किंवा फोन पे ने ९५७९७२४७७३(धीरज पाटील) यांच्याकडे भरावी व दिलेल्या लिंक वर गुगल प्रवेश फॉर्म भरावा.
असे आवाहन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त व्ही व्ही भोसले सर पॉलिटेक्निकचे प्राचार्य व्ही व्ही गिरी सर स्पर्धा समन्वयक एस एन पाटील सर व मुख्य पंच भरत चौगुले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
--