हेरले / प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२० - २१ अंतर्गत, नविन विहिर खुदाई कामाचा पाणी पूजन समारंभ मुडशिंगी ( ता. हातकणंगले) येथील शेतकरी नंदकुमार भोपळे यांच्या शेतावर संपन्न झाला.
जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांच्या शुभहस्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुनीर जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती हातकणंगलेचे कृषी अधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले .
या कार्यक्रमास विस्तार अधिकारी (कृषी) सर्जेराव शिंदे, सौ. अर्चना कारंडे ,सौ. वर्षा पाटील तसेच मुडशिंगी येथील सौ. मीनाक्षी खरशिंगे,सौ.अश्विनी भोसले, शरद पवार, रणजीत चौगुले , शिवाजी भोसले, सतीश खोत, सुरजित शिंदे, सुमित शिंदे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
फोटो
मुडशिंगी येथील कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. पद्माराणी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुनीर जमादार यांच्यासह शेतकरी वर्ग.