हेरले / प्रतिनिधी
आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज तसेच ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिले मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये ग्रंथप्रदर्शन व कवी मंगेश पाडगावकर कलादालन उभे करण्यात आले.त्याचबरोबर मराठी राज्यभाषा दिनानिमित्त प्रशालेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,पाठ्यपुस्तकातील कविता तालासुरात म्हणणे, शब्दकोशातील शब्दांचा अर्थ पाठ करणे ,पुस्तक परीक्षण करणे,अभिवाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.त्याच बरोबर ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे हे उपस्थित होते.आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी.एस.घुगरे ,मुख्याध्यापिका एम डी. घुगरे उपस्थित होत्या.मुख्याध्यापक एम .एच.चौगुले , प्रशासक एस.जी.जाधव ,एस ए. पाटील ,गिरीगोसावी मॅडम, पी.एस.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता मॅडम यांनी केले. मराठी विभाग प्रमुख सौ. एस.एम.बाबर यांनी आभार मानले.