हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील गट क्र. ४०४ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याच्या मागणीचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांना सिद्धेश्वरनगरमधील ग्रामस्थांनी दिले.
हेरले येथील गट क्रमांक ४०४ मधून सार्वजनिक रस्ता करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. हा रस्ता ग्रामस्थांनी पूर्ण करून घ्यावा, असे आश्वासन माजी खासदार राजू शेट्टी यांनी सिद्धेश्वरनगरमधील ग्रामस्थांना दिले. येथील गट क्र. ४०४ मधील सार्वजनिक वहिवाटीस असणारा रस्ता पाटील बंधूंनी अडवला होता. रस्त्याचे काम बंद पाडले होते. याबाबत ग्रामस्थांनी याविरोधात हातकणंगले तहसीलदारांकडे दाद मागितली होती. तहसीलदारांनी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला होता. मुख्यमंत्री सडक योजनेमधून या रस्त्याचे काम सुरू करून रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे.
गावातील पाटील बंधूंनी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देवून फक्त शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे ग्रामस्थांत संभ्रम निर्माण झाला होता.नेमकी शेतकरी संघटना कोणती याबद्दल माजी खासदार शेट्टी यांना ग्रामस्थांनी विचारले असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी ह्या आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेशी काहीही संबंध नाही तो रस्ता पूर्ण करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काहीही हरकत नाही असे सांगितले आहे. यामुळे या रस्त्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.
यावेळी बाळगोंडा पाटील, आमगोंडा पाटील, सुकुमार कोळेकर, अमर मुंडे, मोहसीन जमादार, बाबासाहेब रुईकर, समीर पेंढारी, महेश कोळेकर, राजू बारगीर, राहुल निंबाळकर, संतोष कोळेकर, इरफान पेंढारी, मोईन नायकवडी, फिरोज नायकवडी, शमशुद्दीन मुल्ला, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
हेरले येथील गट क्र. ४०४ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याच्या मागणीचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांना देताना सिद्धेश्वरनगरमधील ग्रामस्थ,