हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे दिशा पेट्रोलिंक्समध्ये सीएनजीचा चोवीस तास पुरवठा करणारे पाच जिल्ह्यातील पहिले स्टेशन ऑनलाईन पंपाचे उद्याटन एच.पी.सी.एल. कंपनीचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक वास्कोचे प्रशांत कांबळे,विभागीय विक्री व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्याचे हर्षद कुंभार, वरिष्ठ अधिकारी विक्री अभियंता वास्कोचे मित त्रिवेदी,एच. पी. ऑइल गॅस प्रा. लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख बाबासाहेब सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक राज झा,दिशा पेट्रोलिंक्स मालक माजी सभापती राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
एच.पी.सी.एल. कंपनीचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक वास्कोचे प्रशांत कांबळे,विभागीय विक्री व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्याचे हर्षद कुंभार यांनी माहिती देतांना म्हणाले की, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, सोलापूर या पाच जिल्ह्यातील पहिले स्टेशन ऑनलाईन पंपाचे उद्घाटन दिशा पंपामध्ये झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सीएनजी वाहनांसाठी ९ सीएनजी गॅस पुरवठा करणारे पंप आहेत. या पंपाना सीएनजी गॅस पुरवठा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथून होत आहे. चोविस तासांमध्ये एक गाडी पंपास गॅस पुरवठा करीत असल्याने व जिल्ह्यात सत्तर हजारापेक्षा जास्त सीएनजी वरील वाहने नोंद असल्याने या नऊ पंपातून सर्वांना सहज व मुबलक गॅस पुरवठा होत नव्हता. त्यामुळे ज्या पंपात गॅस सुरु आहे त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत. त्यांमुळे सर्वच सीएनजी वाहनांना गॅस सहज व मुबलक मिळेलच अशी शाश्वती नव्हती.
सद्या दिशा पेट्रोलिक्स पंपामध्ये ऑन लाईन सीएनजी गॅस पुरवठा स्टेशन झाल्याने या पंपावर चोविस तास सीएनजी गॅस मिळणार आहे. तसेच या ठिकाणाहून अन्य पंपानाही गॅसच्या टाकी भरून पुरवठा होणार असल्याने सर्वच पंपावरती सहज चोविस तास इंधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तासन तास सीएनजी वाहनात भरण्यासाठी रांगेत ताटकळत राहण्याची गरज नाही. या सीएनजी पंपाचे ऑनलाईनचे उद्घाटन झाल्याने वाहन धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सीएनजी वाहन धारकांना मुबलक मिळणार असल्याने प्रवास खिशाला परवडणारा व स्वस्तत होणार आहे.पुढील महिन्यांमध्ये आणखी ६ सीएनजी गॅस पंप सुरु होतील. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सहज व मुबलक सीएनजी गॅस वाहनांना मिळेल अशी माहिती एचपीसीएल कंपनीच्या पदाधिका-यांनी उद्याटन प्रसंगी दिली.
फोटो
हेरले येथे दिशा पंपात सीएनजीच्या ऑनलाईन पंपाचे उद्घाटन करतांना एचपीसीएलचे पदाधिकारी प्रशांत कांबळे, हर्षद कुंभार, मित त्रिवेदी, बाबासाहेब सोनवणे, राज झा, पंपाचे मालक माजी सभापती राजेश पाटील आदी मान्यवर.