हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांची राज्य कार्यकारणीची सभा ही दिनांक 6.2.2022 रोजी औरंगाबाद येथे संपन्न झाली सदर सभेमध्ये श्री जगदीश शिर्के यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली श्री जगदीश शिर्के हे तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर नवे पारगाव येथे कार्यरत आहेत तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संस्था महाराष्ट्र राज्य चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ चे सदस्य, आणि कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा कोल्हापूर उपाध्यक्षपदी म्हणून काम पाहत आहेत श्री जगदीश शिर्के यांच्या कामाची दखल घेऊन राज्याध्यक्ष श्री भरत जगताप यांनी निवड केली