हेरले प्रतिनिधी
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेले चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हातकणंगले पंचायत समिती सभापती सौ.डॉ.सोनाली सुभाष पाटील व अन्य मान्यवर पदाधिकारी यांनी भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.
शेती पंपाची विज कपात व ऊसाच्या एफआरपीचे केलेले तुकडे यामुळे सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरले आहे. या झोपलेल्या बिघाडी सरकारला जाग आणण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. पण त्यांच्या तब्येतेची काळजी घ्यावी असे बिघाडी सरकारला वाटले नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे मी व माझे पती डॉक्टर असलेने त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याचे भाग्य लाभले असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरोलीचे उपसरपंच उदयसिंह पाटील, युवा नेते योगेश कृष्णात खावरे, राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, पेठवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, सचिन गायकवाड,उपसरपंच पिंटू करपे, उद्योजक बाळासो पाटील ,सलीम महात, कोल्हापूर जिल्हा ट्रॅक्टर ट्रॉली असोसिएशनचे अध्यक्ष धनाजी पाटील , ज्येष्ठ शेतकरी रामभाऊ बुडकर, निशिकांत पदमाई, भूये गावचे शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील आदी उपस्थित होते.
फोटो......
पुलाची शिरोली येथील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. सोनाली पाटील, दिलीप पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, उदय पाटील आदी.