कोल्हापूर / प्रतिनिधी
हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या सहाय्यक शिक्षिका यांना शाळेतील लिपिक तथा संस्थाचालक हे शाळेत कामाच्या ठिकाणी छळ आर्थिक पिळवणूक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार लेखी निवेदनाद्वारे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाकडे प्राप्त झाल्याने व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली माध्यामिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दोषींवर कारवाई करून महिला शिक्षकेला न्याय देण्याची मागणी केली.
शिक्षिका या गेली अनेक वर्षे सहाय्यक शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असून त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून परिसरात परिचित आहेत. अशा या गुणवंत व शिस्तप्रिय शिक्षिकेचा कामाच्या ठिकाणी छळ व आर्थिक पिळवणूक करून महिला शिक्षिकेशी उद्धटपणे वागत आहेत. अशा प्रकारच्या दैनदिन छळाच्या त्रासाला कंटाळून सदर शिक्षिकेने आपल्या जिवाचे बरे वाईट केलेस शिक्षण क्षेत्राला लाच्छंनास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागेल . तेंव्हा सदर दोषींची शिक्षण खात्यामार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य प्रकारची कारवाई करून या शिक्षिकेस न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचेकडे केली.
सदर शिक्षिकेस न्याय न मिळालेस कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दोषींना त्वरित नोटीस देऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
या प्रसंगी अध्यक्ष एस. डी.लाड, व्ही. जी. पोवार, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, आर.वाय. पाटील, पी.एस. हेरवाडे, एस. के. पाटील, व्ही.जी. पाटील राजू बरगे, शिवाजीराव चौगुले,जगदीश शिर्के, गजानन काटकर, अरुण मुजुमदार, राजेश वरक, वर्षा पाटील, प्रकाश पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना लेखी निवेदन देतांना अध्यक्ष एस. डी.लाड, व्ही जी पोवार, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, आर.वाय. पाटील, पी.एस. हेरवाडे, एस. के. पाटील, व्ही.जी. पाटील राजू बरगे, शिवाजीराव चौगुले,जगदीश शिर्के, गजानन काटकर, अरुण मुजुमदार, राजेश वरक, वर्षा पाटील, प्रकाश पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.