सिद्धनेर्ली - रवींद्र पाटील ( पत्रकार)
मी बच्चा आहे का कोण आहे हे कागलची जनता 2019 ला दाखवेल.भावनिक होऊन जनतेला फसवण्याचे दिवस आता राज्य कर्त्याचे गेले आहेत.कागलच्या इतिहासात ज्या चुका झाल्या आहेत त्या वर्तमान काळात सुधारण्याची संधी द्या असे मत म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिह घाटगे यांनी मांडले .ते सिद्धनेर्ली येथील आयोजित केलेल्या चर्मकार समाज उद्बोधन मेळावा दरम्यान बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दत्तात्रय माने हे होते.
घाटगे पुढे म्हणाले कागल तालुक्यात बचत गटाचा वापर फक्त राजकारणासाठी केला आहे पण आता तसे होऊ नये म्हणून कागल तालुक्यातील महिला बचतगटासाठी उद्योग निर्मिती करणार आहोत त्याच बरोबर कागल मध्ये राजमाता जिजाऊच्या नावाने बझार काढून त्या मध्ये सर्व उत्पादने ही महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करून तू विक्रीसाठी ठेवण्यात येणात आहेत .तसेच येत्या शिवजयंतीला तालुकातील सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येऊन अशी शिवजयंती साजरी करूया की कागलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले पाहिजे त्या साठी महापुरुषांना समाजाच्या चौकटीत न बांधता सर्व समजतील लोकांनी एकत्र येऊन सगळ्याच महापुरुषांना वंदन केले पाहिजे असेही ते बोलताना म्हणाले या वेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक मारुती माने यांनी केले .या कार्यक्रमात अनिल पवार, सुनील मगदूम शिवाजी गाडेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .या वेळी अण्णा सांडूगडे ,पुस्पलता मगदूम ,सुनील मगदुम ,अनिल पवार, शिवाजी गाडेकर ,सिद्धनेर्लीच्या सरपंच सौ नीता पाटील,मनोहर घराळ तानाजी माने आदी मान्यवर उवस्तीत होते त्याच बरोबर चर्मकार समाजाचे सर्व बांधव ,गावतील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उवस्तीत होते.आभार धनाजी माने यांनी मानले.
फोटो -चर्मकार समाजच्या मेळाव्या दरम्यानर म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिह घाटगे सोबत शिवाजी गाडेकर ,सुनील मगदूम अण्णा सांडूगडे व इतर मान्यवर