एम. आर. आय. टेस्ट : समग्र माहिती
ज्ञानराज पाटील कोल्हापूर
मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे एम. आय. आर. चे पुर्ण रुप आहे यामध्ये अतितीव्र चुंबक व रेडिओ लहरी वापरल्या जातात. यात वापरण्यात येणाऱ्या रेडीओ लहरी या एका तीव्र चुंबकीय क्षेत्रातून जातात . त्यामुळे शरीरातील आतील अवयवांच्या अगदी ठळक चांगल्या चित्र प्रती निघतात. इंद्रिये जशी आहेत तशीच हुबेहूब दिसू शकतात.
MRI मशिनच्या चुंबकाची जशी क्षमता असेल तशी प्रतिमा जास्त स्पष्ट येते. या तपासणीमध्ये लोहचुंबक (विद्युत चुंबक) वापरत असल्यामुळे रुग्णाने मोबाईल फोन्स, पैसे (नाणी) चाव्या, पट्टा इत्यादी धातूंचे ऐवज जवळ ठेवू नयेत.
यापूर्वी एका नेत्याच्या अंगरक्षकाचे रिव्हॉल्व्हर या मशीन ने खेचून घेतले होते तर परवाच एका तरुणाचा मृत्यू झाला कारण तो लोखंडी अॉक्सिजन सिलेंडर घेऊन मशीन रुममध्ये गेला होता.
एमआरआय मशीन मध्ये खेचला गेल्याने राजेश मारू या तरुणाचा जीव हकनाक गेला. राजेश त्याच्या बहिणीच्या सासूला एमआरआय स्कॅनिंग सेंटर पर्यंत नेत होता. त्याच्या हातात यावेळी ऑक्सिजन सिलेंडर होतं. एमआरआय स्कॅनींग मशीन जवळ कोणतीही धातूची वस्तू नेण्यास मनाई असतानाही राजेशने ऑक्सिजन सिलेंडर मशीन असलेल्या रूम मध्ये नेलं. यावेळी एमआरआय मशीन बंद असल्याचं सांगून वॉर्डबॉयने त्यांना आत सोडलं होतं पण खरं तर यावेळी मशीन चालू होती. आत गेल्या गेल्या राजेशला मशीनने काही क्षणात खेचून घेतलं. त्याला लगेचच बाहेर काढण्यात आलं पण थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.
एम आर आय च्या टेस्ट साठी जवळपास पूर्णपणे अर्धा तास ते एक तास लागू शकतो. एम आर आय टेस्ट ज्या टेबलावर आपण झोपतो तो चुंबकीय क्षेत्राताच्या चेंबरमध्ये मध्ये सरकतो . या मशीन ने वेगवेगळ्या कोनातून भरपूर चित्र प्रतिमा (इमेजेस) काढल्या जातात. हे मशीन खूप मोठा आवाज करतं, जसे आदळल्यासाखा ठॉकठॉक , बजींग, टकटक वगैरे!! यामुळे कानात घालून दिलेल्या इअरप्लगमुळे आवाजाची तीव्रता कमी होते.
तपासणी करताना शांत पणे पडून राहिले पाहिजे. हलले तर नोंदी व्यवस्थित येत नाहीत.