प्रतिनिधी दि.२१/२/१८
मिलींद बारवडे
केंद्रीय मुख्याध्यापकांप्रमाणेे राज्यातील मध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना ७ व्या वेतन आयोगात वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी.पोवार यांनी केली.
अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाध्यक्ष विजयसिंह गायकवाड होते. या बैठकीत शाळांच्या प्रशासकीय व शालेय अडचणी, अतिरिक्त कामे, नवीन अंशदायी पेन्शन योजना, शालेय व शिक्षकेतर कर्मचारी भरती, शैक्षणिक आदेश व शिक्षण सचिवांची कार्यपध्दती, शालार्थ मध्ये समाविष्ठ नसलेल्या कर्मचाऱ्यांना समाविष्ठ करणे, शाळा बंदबाबतचे शासन धोरण, निकषपात्र शाळा व तुकड्यांचे अनुदान तरतुदीबाबत आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी राज्य सचिव आदिनाथ थोरात, माजी अध्यक्ष अरुण थोरात, जे. के. पाटील, आर. वाय.पाटील, डॉ. ए.एम.पाटील, डी.एस.घुगरे, राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करतांना राज्याध्यक्ष विजयसिंह गायकवाड, उपाध्यक्ष व्ही.जी. पोवार व अन्य मान्यवर