कोल्हापूर प्रतिनिधी दि. १६/२/१८
हातकणंगले तालूक्यातील हेरले येथे चोरट्यांनी बुलेट जाळून खाक केली व एक मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न करून दोन मोटरसायकलचे नुकसान केले तर एक मोटरसायकल चोरून नेली. या घटनेने गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरूवारी मथ्यरात्री घडली.
हेरले गावातील भुपाल भिमगोंडा पाटील जैन मंदिर जवळ राहतात. त्यांची बुलेट (MH - O9AE7097) जळून खाक झाली तर त्यांची दुसरी हिरो पॅशन मोटरसायकल( MHo93463) चोरून नेली होती. मात्र त्यातील पेट्रोल संपल्याने ती गाडी वडगांव हद्दीत सोडून दिली. शेजारी महेश बाळासो गुमताज यांची हिरो पॅशन क्र.(MH09 BE 2544) मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न केला मात्र थोडया प्रमाणात झळ लागून थोडे नुकसान झाले.
रावसाहेब बाबू इंगळे यांची हिरो स्प्लेंडर क्र. (MHO9A 492) चोरून नेली. तसेच आबूबकर जमादार यांच्या दोन मोटरसायकल चोरून नेल्या मात्र चोरट्यांनी पेट्रोल काढून घेतले व बॅटरी, हॉर्न चोरून नेले व दोन मोटरसायकल हेरले बस स्टॅडजवळ सोडून पोबारा केला.
गुरूवारी रात्री चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळाने गावात भितीचे वातारण निर्माण झाले आहे. सदरच्या घटनेचे गांभिर्य पाहून हातकणंगले पोलीसांनी रात्रीचा गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करून या अपप्रवृत्तीस पायबंद घालावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.
फोटो
हेरले (ता. हातकणंगले) येथे भुपाल पाटील यांची बुलेट अज्ञाताने जाळली .
( छाया सलीम खतीब)