हेरले / प्रतिनिधी : मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथे गेल्या पाच दिवसापासुन सुरू असलेल्या दुसऱ्या वर्षाच्या क्रिकेटचा थरार आज संपून मौजे वडगांव प्रिमीअर लिगचा प्रथम क्रमांकाचा मानकरी दिनेश ज्वेलर्स तर द्वितीय क्रमाकाचा मानकरी एस .टी. ग्रुप ठरला. यांना ट्रॉफी व अनुक्रमे सात हजार, पाच हजार व प्रत्येक खेळाडूंना मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले.
स्पर्धात एकूण आठ संघ मालकांनी भाग घेतला. सदरची स्पर्धा IPL प्रमाणे भरवण्याचा प्रयत्न मौजे वडगांव मधील तरुणांनी केला.एकूण ८८ खेळाडूनी भाग घेतला. प्रत्येक संघमालकाने आपल्या खेळाडूनां टी शर्ट देऊन संघ एकसारखा दिसावा व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून पि.के. सामाजीक सेवा ग्रुपने संपूर्ण किट आपल्या टिमला दिले.IPL प्रमाणे खेळाडूंची बोली लागली व बक्षीस देखील IPL प्रमाणे बेस्ट बॉलर,किपर, बॅट्समन, हॅट्रीक, सलग चौकार, तर प्रत्येक रनसाठी देखील पि.के. पॉलिटीक्स यांनी बक्षीस लावून अंतिम सामन्यात रंगत आणली, यामध्ये वैयक्तीक बक्षीस सचिन लोहार, शब्बीर हजारी, शिवकुमार चौगुले, महादेव चौगुले, सुनिल खारेपासणे, कुंदन बनसोडे यांनी व इतर मान्यवरानी दिली.
स्पर्धा संपन्न करणेसाठी सर्व तरूण मंडळे, ग्रामस्थ, प्रशांत पाटील, गौस पटेल, मोहसीन बारगीर,विकी भोसले, राहूल भोसले, संदिप नलवडे, जमीर मुलाणी, प्रविण पाटील, स्वप्नील चौगुले, सुशांत खारेपाटणे, फारूक बारगीर, अवधूत मुसळे, प्रसन्न कांबरे, राकेश सावंत, अतुल, विशाल अकिवाटे, चंदू बारगीर, राजू डोरले, यांचे मोलाचे योगदान लाभले.
कॉमेंट्री साठी झाकीर बारगीर यांच योगदान तर हांपायर म्हणून सुनिल लोंढे, सुभाष पाटील, प्रदिप रजपूत,संतोष माळी यांच योगदान लाभले, तर फोटोग्राफी साठी विश्वास शेंडगे यांच मोलाच योगदान लाभले.बक्षिस वितरण साठी स्वागत प्रविण पाटील तर प्रास्तवीक राकेश सावंत यांनी केले.
फोटो : प्रथम क्रमांकांच्या चषकासह संघ मालक दिनेश ज्वेलर्स कर्णधार सुशांत खारेपारणे व संघातील सर्व खेळाडू