कोल्हापूर - मिलींद बारवडे
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या प्रसिध्दी प्रमुखपदी स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांची निवड अध्यक्ष एस.डी. लाड यांनी केली.
शैक्षणिक व्यासपीठ जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांच्या संकल्पनेतून एकोणतीस शिक्षक संघटना एकत्रित होऊन शिक्षक शिखर संघटना गठीत झालेली आहे. शैक्षणिक व शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य अग्रक्रमाने केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शहरे, बारा तालूक्यामधील गावागावामधील माध्यमिक शाळांना व शिक्षकांना संघाची ध्येय धोरण आदींचा संदेश पोहचविण्यासाठी प्रसार माध्यम महत्त्वाचे असल्याने प्रसिद्धी प्रमुख या जबाबदरीच्या पदावर सर्व दैनिकांशी स्नेह असणारे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
प्रसिध्दी प्रमुख निवडीचे पत्र सुधाकर निर्मळे यांना प्रदान करतांना अध्यक्ष एस.डी. लाड, वसंतराव देशमुख, जयंत आसगावकर,आर. वाय. पाटील, व्ही.जी. पोवार, उदय पाटील, संदीप पाटील, बी.डी. पाटील, बी.जी. बोराडे, सी.एम.गायकवाड, सी.आर. गोडसे, बी.एस. खामकर,मिलीद बारवडे, भाऊसाहेब सकट, आदीसह अन्य मान्यवर पदाधिकारी.