कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार
रविवार दि.12 रोजी रात्री 9. 30च्या सुमाराला अनिल विलास चौगले वय 40रा.भोसलेवाडी कोल्हापूर यांना धक्का बुक्की करून अज्ञात चौघांनी त्याच्या गळ्यातील चेन चोरून नेल्याची घटना घडली होती या गुन्ह्याचा छडा अवघ्या 24तासात लावून चौघांना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली.
ओंकार प्रदीप पाटील वय 19रा. गंजीमाळ संभाजी नगर, अमोल दिलीप खरजे वय21 रा.भारतनगर शेंडा पार्क , अविनाश गंगाधर सुतार वय19रा कनान नगर, मेहबूब ईलाही खलीफा वय23रा.कनाननगर
अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या कडील सुमारे 60हजार किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चौगले हे त्याच्या मित्रासोबत सी बी एस येथील दारू दुकानातून मद्य पिऊन बाहेर पडले होते तेथून ते आपल्या गाडीजवळ गेले असता त्यांना वरील चोरट्यांनी घेराव घालून धक्का बुक्की करून त्यांच्या गळ्यातील चेन 25ग्रॅम वजनाची सुमारे 60हजार किमतीची सोन्याची चेन हिसडा मारून नेली होती.
यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी आपल्या शिताफीने अवघ्या 24तासात हा गुन्हा उघडकीस आणला.
सदर ची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमॄतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी चे पोलीस निरीक्षक संजय मोरे एलसीबी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित सहाय्यक फौजदार संदीप जाधव आदींनी तपास केला.