प्रतिनिधी दि. १४/२/१८
कन्या विद्यामंदिर हेरले (ता. हातकणंगले)येथील विद्यार्थिनी कुमारी दिक्षा नंदकुमार कांबळे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीची इस्रो भेटीसाठी निवड झालेने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकूण ४८ विद्यार्थी व इस्रो भेटीसाठी विमानाने जाणार आहेत .यासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी ४ विद्यार्थ्यांची निवड करणेत आली आहे .या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून इ. पाचवी वी ते आठवीच्या विद्यार्थ्याला विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून प्रत्येकी १२ विद्यार्थी निवडणेत आले. सदरच्या विद्यार्थ्यांच्या शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विभागामार्फत ५० गुणांच्या मुलाखती घेऊन त्यातून सर्वोत्कृष्ट अशा प्रत्येक तालुकावर ४ अशा एकूण ४८ विद्यार्थी निवडण्यात आले .सदरचे हे विद्यार्थी केरळमधील तिरुअनंतपुरममधील इस्रो व कर्नाटकमधील बंगळूरमधील सायन्स म्युझियम पाहणार आहेत. सदरचा हा दौरा चार दिवसांचा आहे . कु.दिक्षा कांबळे हिला मुख्याध्यापक बाळासो कोठावळे, वर्गशिक्षक अर्जुन पाटील ,मार्गदर्शक विजयमाला पाटील तसेच दिनकर जिरगे ,भिवाजी लोखंडे सचिन असवले , सायली चव्हाण ,उज्ज्वला कोळी व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
सदरचा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .कुणाल खेमणार यांच्या संकल्पनेनुसार जि .प .अध्यक्षा शौमिका महाडिक ,उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या मान्यतेने यांच्या मान्यतेने व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणविस्तार अधिकारी डी.सी. कुंभार यांच्या देखरेखीखाली संपन्न होत आहे .