प्रतिनिधी दि. ११/२/१८
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील उपसरपंच किरण चौगुले यांना संत रोहिदास रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य तालुका हातकणंगले यांच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील समाजसेवकांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन संत सोहिदास रत्न पुरस्काराने संघाच्या वतीने सन्मानीत करण्यात येते.
संत रोहिदास रत्न पुरस्कार मौजे वडगावचे उपसरपंच किरण बाळासो चौगुले यांना त्यांच्या समाजसेवा कार्याबद्दल हा पुरस्कार आम.डॉ. सुजित मिणचेकर,राज्याध्यक्ष रघुनाथ मोरे यांच्या हस्ते शिक्षक भवन हॉल हातकणंगले येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
फोटो
मौजे वडगावचे उपसरपंच किरण चौगुले यांना संत रोहिदास रत्न पुरस्कार प्रदान करतांना आम.डॉ. सुजीत मिणचेकर, राज्याध्यक्ष रघुनाथ मोरे व इतर मान्यवर.