पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.२२/९/२०
मिलींद बारवडे
महाराष्ट्र शासनाने शिक्षणक्षेत्रातील कोणतेही निर्णय घेत असताना शिक्षणक्षेत्रातील समन्वय समिती नेमून त्यानंतरच याबाबतीत निर्णय घ्यावेत असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा.जयंत आसगावकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, कोल्हापूर विभाग यांच्यावतीने आणि कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा.आसगावकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षण संस्था महामंडळाच्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
प्रा. आसगावकर यांनी यापुढील काळात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आणि त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही याबाबत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील शिक्षण संस्था महामंडळाला विश्वासात घ्यावे असे सांगितले.
या वेबिनारमध्ये गोपाळ सामंत यांनी सर्वोच्च न्यायालयामधील खटल्याची माहिती दिली. यावेळी वेबिनारमध्ये इयत्ता ५ वीचा वर्ग ४ थीला जोडणे, प्रस्तावित नवीन संच मान्यता निकषाबाबत हरकती, चालू वर्षाचे वेतनेतर अनुदान, पवित्र पोर्टल नोकर भरती या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेबिनरला महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील ,उपाध्यक्ष वसंत पूईखेडकर, उपाध्यक्ष अशोक थोरात, कायदेशीर सल्लागार रवींद्र फडणवीस, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, प्रा.सी एम गायकवाड उपस्थित होते. या वेबिनारमध्ये शिक्षण चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थासमोरील अडचणी मांडून काही सूचना केल्या. आभार विभागाचे अध्यक्ष शिवाजी माळकर यांनी मानले.