पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.3/9/20
महाराष्ट्रातील एक आदर्श असे जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी निर्माण केले आहे. ते जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे. कॉर्पोरेट ऑफिस सारखे सुसज्ज कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आदर्शवाद कार्यालय म्हणून तिची गणनना निश्चित केली जाईल असे उद्घाटन प्रसंगी डी एस घुगरे यांनी मत व्यक्त करून जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्वांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण मनोहर परिट शिवाजी पाटील तसेच क्रीडा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
जिल्हा क्रीडा कार्यालयाचे उद्घाटन करतांना प्राचार्य डी एस घुगरे शेजारी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे व अन्य मान्यवर.