कसबा बावडा, ता. ३ (प्रतिनिधी) ः
येथील डॅफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत शिवांश पोवार या विद्यार्थ्याने दोन्ही गटात बक्षिसे पटकावली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवामी कन्सल्टींग यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः वक्तृत्व स्पर्धा - कर्ण सूर्यवंशी (प्रथम), राजदीप पाटील (द्वितीय), शिवांश पोवार (तृतीय). चित्रकला स्पर्धा - आराध्या धनवडे (प्रथम), स्मीत कांबळे (द्वितीय), शिवांश पोवार (तृतीय).
चित्रकला स्पर्धा (मध्यम गट) - प्रचितेश शिंगे (प्रथम). वक्तृत्व स्पर्धा (मोठा गट) - मुधिता (प्रथम), श्रृतिका पुजारी (द्वितीय). ऑनलाईन स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ऑनलाईन स्पर्धेला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल शिवामी कन्सल्टींगतर्फे दरवर्षी अशा प्रकारे स्पर्धा घेण्याचा विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. डॅफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापनाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पालकांनी मुलांच्या उपजत गुणांवर लक्ष्य देऊन त्यांना शिक्षण द्यावे असे शिवामीचे संस्थापक अमित कुंभार यांनी सांगितले.