*नंदुरबार - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) - - - - -* जगात सर्वात शक्तीशाली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांचा वाढ दिवस तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय व महात्मा गांधी यांची जयंती दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या वाढ दिनानिमित्त सेवा सप्ताह साजरा करावा,असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी केले.
तेली मंगलकार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आदिवासी सेलचे प्रदेशउपाध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जिल्हाउपाध्यक्ष मकरंदभाई पाटील उपस्थित होते.
विजय चौधरी पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढ दिवस हारतुर्रे पोष्टरबाजी न करता सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा करावयाचा आहे. सत्तरव्या वाढ दिनाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात यावे,अशा पध्दतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केले आहे.त्या पध्दतीनेच जिल्हयात सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. परिसरातीतल दिव्यांगांची माहिती घेऊन ७० दीव्यांगांना कृत्रिम अवयव व उपकरण प्रदान करावे,७० गरीब वस्त्यांमध्ये किंवा रूग्णालयात फळांचे वाटप करावे,७० जणांना स्थानिक गरजेनुसार प्लाझ्मा दान करावा,युवा मोर्चाच्या माध्यमातून ७० रक्तदान शिबीरे घेण्यात यावी, ७० वृक्षांची लागवड करण्यात यावी,७० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे यासह ७० व्हर्चूअल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येणार आहेत.
२५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती तर २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्याचे आवाहन विजय चौधरी यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश माळी यांनी केले तर आभार राजेंद्र गावित यांनी मानले.
तसेच बैठक यशस्वीतेसाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष हर्षल पाटील ,शहराध्यक्ष नरेंद्र माळी,खुशाल चौधरी आदींनी परीश्रम् घेतले.