कोल्हापूर दिनांक 26
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.हे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार महापौर सौ निलोफर आजरेकर यांनी काढले .
प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गेली सहा महिने सातत्याने कोरोना च्या वेगवेगळ्या कामात कार्यरत आहेत.या सर्वांना तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले .
यावेळी स्थायी सभापती सचिन पाटील,मुख्य शहरअभियंता नेत्रदीप सरनोबत पतसंस्थेचे चेअरमन संजय पाटील,खजानिस उमेश देसाई संचालक प्रकाश पाटील,उत्तम गुरव,सुभाष धादवड,वसंत आडके,शिवराज नलवडे राजेंद्र गेंजगे,विजय माळी शकील भेंडवडे,विजय जाधव,दिलीप माने,सुनील पाटील,फारुक डबीर,संतोष कदम,अनिल बचाटे,योगेश व्हटकर,मंगेश चव्हाण,राजाराम शिंदेआदी कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत सचिव सुधाकर सावंत यांनी केले आभार चेअरमन संजय पाटील यांनी मानले.