प्रतिनिधी सतिश लोहार
**
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या उदगाव या ठिकाणी असलेलं जैन तिर्थक्षेत्र कुंजवन या ठिकाणी 2 मोठी मंगल कार्यालयं अन राहण्यासाठी भरपूर खोल्या आहेत. कोरोनाची साथ सुरु झाली अन परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसताच कुंजवनच्या ट्रस्टी लोकांनी हा परिसर शासनाच्या कोविड सेंटरसाठी दिला. सध्या इथे 80 रुग्ण कोरोना वर उपचार घेत आहेत.
या सेंटरचं खास वैशिष्ट म्हणजे इथला निसर्गरम्य परिसर भरपूर झाडी, मोठी अन स्वच्छ जागा, मंदीर, स्वतंत्र किचनची सोय अशा गोष्टींमुळे इथले पेशंटस "आपण इथे उपचार घेण्यासाठी आलोय" हेही विसरून जातात. इथे जेवण बनवणारे शुभम नावाचे आचारी अन त्यांच्या स्टाफचं तर विशेष कौतुक सर्वांना स्वादिष्ट नाश्ता, चहा,बिस्किटं, दोन वेळचं रुचकर जेवण, जेवणासोबत एखादं फळ अशा गोष्टींमुळे पेशंटसना अगदी घरच्यासारखं जेवण मिळतं. स्वच्छता तर नावाजण्यासारखी आहे जेवणाची पंगतही बाहेर कट्ट्यावर अगदी हवेशीर जागेत बसते. हे सगळं अतिशय खेळीमेळीत चाललेलं असतं. बाहेर दोन तीन लाख भरुन एडमिट केलेल्या पेशंटना ही असं जेवण मिळत नाही. हे मी स्वत: डोळ्यांनी पाहिल माझी आणि नेजे सर यांची दिनांक 4 /8/2020 ते 20 /8 /2020 पेशंट रिपोरटिंग साठी नेमणूक झाली आणि आम्हीही समाज भान जपून लगेच कामाला सुरुवात केली रोज सकाळी 9.00 वाजता 11 व 2 आणि 4 वाजता कुंजवणं आणि जे जे हॉस्पिटल जयसिंगपूर या दोन्ही केंद्रावरील रिपोर्ट कार्ड तयार करून ते पोर्टल वरती अपलोड करण्याचे काम आम्ही गेली पंधरा दिवस निरंतर रेपोर्टिंग करीत आहोत किती पेशंटdischarge refral झाले नवीन किती दाखल झाले जेणेकरून सर्वाना समजेल की शिरोळ तालुक्यात कोणत्या कोविडं केअर सेन्टर वरती किती oxygen बेड आहेत किती सिलेंडर शिल्लक आहेत हे समजत आगर कोविडं केअर सेन्टर वरती सतीश कोळी सर आणि मोदी कोविडं केअर सेन्टर वरती हाके सर असे आम्ही चारजण निरंतर काम करीत आहोत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे या ठिकाणी मला नमूद काराव अस वाटत श्री नेजे सर आणि मी अनिल सुतार आम्हीं दोघांनी जेजे हॉस्पिटल आणि उदगाव कुंजवणं या दोन सेंटर चे रेपोर्टिंग अचूक करीत आहोत जेणे करून योगेश पाटील विशीतला तरुण नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला ज्याने कमी वेळेत तालुक्यातील सर्व सेंटर स्वतः सेटअप नियोजन पूर्वक लावण्यात यश मिळवले त्यामुळेच तालुक्यात आदर्श सेन्टर यशस्वीपणे कार्यरत आहेत हेरवाड मधील एक तरुण जो कोविडं positive होता त्याने संपर्क करून उदगाव येथे दाखल झाला आणि तो आज येथील उपचार घेऊन समाधान व्यक्त करत कृतज्ञता पूर्वक भाव त्याच्या डोळ्यात सर्वप्रति दिसत होताआता सर्वात महत्वाचा मुद्दा इथले उपचार या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून ड्यूटीवर असणारे डॉ. कंदले सर अन त्यांच्या संपूर्ण स्टाफला पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो. या लोकांनी इथे खरोखर इतकं आदर्शवत काम केलंय, की काही विचारुच नका. इथून बाहेर पडणारा प्रत्येक पेशंट इथल्या संपूर्ण टीमचं मनापासून गुणगान गातोय. अगदी ऑक्सीजन लेवल 75 ला आलेल्या अन HRCT स्कोअर 18 असलेल्या पेशंटसवर या टीमने इथे उपचार करुन खडखडीत बरे करुन घरी पाठवलंय. 15 वर्षांपासून 85 वर्षे वय असलेले पेशंटस इथे रिकव्हर झालेत. सीरियस पेशंटसना आपल्या केबीनच्या शेजारच्या रूम्समधे ठेवून त्यांच्यावर जातीने लक्ष ठेवलं जातं. ठिक झालेल्या पेशंटसना वरच्या खोल्यांमधे शिफ्ट करतात. इथे पेशंटला आपण हॉस्पिटलमधे आहे, किंवा कोरोनावर उपचार घेतोय हे आठवतही नाही. सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांशी गप्पा मारत यांचे 8- 10 दिवस मजेत निघून जातात. या 8 दिवसात इथल्या रुग्णांमधे इतका जिव्हाळा निर्माण होतो, की एखादा डिस्चार्ज होऊन बाहेर पडत असताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू असतात. हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. बर्याच पेशंटचे नातेवाईक सर्वांना पुरतील इतकी बिस्किटं, फळं वगैरे आणून देतात. ते आचार्यांमार्फत सर्वांना वाटलं जातं. खरोखर इथला आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे , अतिशय प्रामाणिकपणे अन नि:स्वार्थीपणे आपलं कर्तव्य पार पाडत असलेल्या डॉ. कंदले अन योगेश पाटील सर त्यांच्या संपूर्ण टीमचा शासनाकडून यथोचित सन्मान हा झालाच पाहिजे असे मत पत्रकार सतिश लोहार यांचे समोर तेथे कोरोना ड्युटीवर असणारे, 2O17 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे शिक्षक अनिल सुतार सर ( विद्या मंदिर, शिवनाकवाडी ) यांनी व्यक्त केले .