'रोटरी क्लब ऑफ गार्गीज' च्यावतीने 'नेशन बिल्डर' पुरस्कार १७ शिक्षकांना प्रदान
पेठ वडगाव / प्रतिनिधी
मिलींद वारवडे
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी मुलांच्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याबरोबरच समाजाभिमुख विधायक कार्य करावे असे आवाहन रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित 'नेशन बिल्डर पुरस्कार २०२०-२१ ' वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत हा कार्यक्रम पार पडला.
कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक आर.आर. पाटील, मुख्याध्यापक संजय चौगुले, उपप्राचार्य प्रा. शामराव पाटील, अर्जुन पाटील, राजेंद्र कोरे, लक्ष्मी पाटील, नुतन सकट, दीपक शेटे, अँथनी डिसोजा, सतिश भोसले, प्रशांत भोरे ,फुलसिंग जाधव, मुख्याध्यापक बाबासाहेब कांबळे, मुख्याध्यापक दशरथ चौगुले, अमृता पाटील आदींना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल सुहास कुलकर्णी म्हणाले, शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल. रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या अध्यक्षा गौरी शिरगावकर यांनी प्रास्ताविकात क्लबच्या कार्याचा आढावा घेत २३२ देशात १२ लाख रोटेरीयन कार्यरत असून समाजातील मूलभूत प्रश्नांच्यावरती क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. उत्कर्षा पाटील यांनी समाजातील गरजू लोकांपर्यंत शिक्षकांनी पोहचण्याचे आवाहन यावेळी केले.वडगाव विद्यालयाचे प्राचार्य आर .आर .पाटील व प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मी पाटील यांची मनोगते झाली.
या कार्यक्रमास विशाखा आपटे ,सुजाता लोहिया ,मीरा कुलकर्णी , स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे , जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सकट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अनघा पेंढारकर यांनी केले. आभार अंजली मोहिते यांनी मानले.
फोटो
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ गार्गीज यांच्यावतीने आयोजित 'नेशन बिल्डर पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या समवेत संग्राम पाटील, सुहास कुलकर्णी, गौरी शिरगावकर ,उत्कर्षा पाटील व अंजली मोहिते आदी मान्यवर