प्रतिनिधी सतिश लोहार
*निलेवाडी मध्ये समाज उपयोगी उपक्रम पार पडला*
पक्के लायसन्स टेस्ट देण्याच्या प्रसंगी आरटीओ इन्स्पेक्टर प्रदीप शिंगारे, आरटीओ इन्स्पेक्टर बालाजी धनवे , असिस्टंट इन्स्पेक्टर उगले, असिस्टंट इन्स्पेक्टर मस्के, सरपंच ,उपसरपंच, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, आणि आवर्जून पक्के लायसन्स काढायला आलेले बंधू-भगिनी आणि निलेवाडी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .अनेक भगिनींना व बांधवांना वाहन चालवण्याचा पक्का परवाना मिळतो ,याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोचण्याचा मार्ग मिळतोय परंतु, या मार्गावर मार्गक्रमण करत असताना, वेगावर नियंत्रण ठेवणं, अत्यंत गरजेचे आहे. वेगावर जरी नियंत्रण ठेवणं आवश्यक असलं तरी, सकारात्मक विचार पाहता, पॉझिटिव्हिटी ,माणसातील चांगुलपणा , अभियान माणुसकी वर प्रेम करणे, एकमेकाला मदत करणे ,या गोष्टीवर नियंत्रण ठेवायची गरज नाही , चांगल्या गोष्टीचा प्रत्येकाने हात पकडला पाहिजे,हाच विचार समोर ठेवून चांगुलपणाची चळवळ वसुमन साई महिला व बालकल्याण संस्था, समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. महात्मा फुले म्हणायचे एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती मोठी होते परंतु ,एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब मोठं होतं हाच विचार माझी आई स्वर्गीय सुमन साई यांनी आम्हा तिनी भावंडांना दिला,
आज मला खूप आनंद होतोय निलेवाडी तील मध्ये सुद्धा माझ्या 10:20 भगिनींनी उपक्रमाच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळते माझ्या बाजूने निश्चितपणे ही जी काही संधी मिळाली, त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचे, जीवन गतिशील बनवतील, संधीच सोन बनवतील,
एखाद्या संधीचा संधीसाधूपणा दुरुपयोग किंवा संधीच सोनं करणे यात फरक आहे.संधीसाधूपणा एका व्यक्ती पुरता मर्यादित राहतो .वैयक्तिक स्वार्थ पेक्षा, संधीचं सोनं करून, समाजाचा केव्हाही चांगलं करण हे महत्वाचे
डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रेरणेने होत असलेल्या या कार्यक्रमात ,आरटीओ खात्याने जे सहकार्य केले,क्लेरिकल स्टाफ ,मी प्रतिभा शिंगारे सौ सुमन साई महिला व बालकल्याण संस्था यांच्यामार्फत आभार मानते . निलेवाडी तील ग्रामस्थांचा सहकार्यामुळेच अनेक उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भविष्यातही अनेक उपक्रम राबवण्याचा मनोदय आहे.सहकार्य कराल ही अपेक्षा करते ,आणि या सर्व कार्यसिद्धीसाठी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले प्रदीप शिंगारे , डॉ .ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचे शतशः आभार प्रतिभा शिंगारे अध्यक्ष सुमन साई महिला व बाल कल्याण संस्था महिला व बालकल्याण संस्था यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या .