हेरले / प्रतिनिधी
दि.13/9/20
श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या आशिर्वादाने
रुकडी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये
महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्यामार्फत पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली रुकडी, हेरले, हालोंडी , माले , चोकाक , मुडशिंगी, अतिग्रे आदी सात गावच्या ग्रामपंचायतीच्या सौजन्याने रोगप्रतिकारक इम्युनिटी बुस्टर १० हजार बॉटलसचे मोफत घरपोच वाटप मोहिम हेरले ग्रामपंचायती पासून सुरवात करण्यात आली.
तरी सर्वानी मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सेवन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रसंगी पोलीस पाटील नयन पाटील , सरपंच अश्विनी चौगुले ,उपसरपंच राहुल शेटे, माजी उपसरपंच विजय भोसले, संदिप चौगुले माजी उपसभापती अशोक मुंडे आदीसह ग्राम पंचायत सदस्य व महिला मंडळ उपस्थित होते.
फोटो
हेरले येथे महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील इम्युनिटी बुस्टर बॉटलचे वाटप करतांना इतर मान्यवर व नागरिक.