पेठ वडगांव / प्रतिनिधी
दि.8/9/20 राजेंद्र कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सप्टेंबर शिक्षक दिनी झालेल्या ऑनलाइन सभेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कार्यरत महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या राज्यस्तरीय कोर कमिटीचे नूतनीकरण करण्यात आले. या कोर कमिटीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शिवाजी पाटील क्रीडा शिक्षक आदर्श विद्यानिकेतन मिणचे यांची निवड करण्यात आली. शारीरिक शिक्षणातील व क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शारीरिक शिक्षण महासंघात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या निवडीवर प्रतिक्रिया देत असताना शिवाजी पाटील यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रात निर्माण होत असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या पदाचा नक्कीच वापर होईल असा आशावाद व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे . क्रीडा क्षेत्रात काम करत असतान त्यांना प्राचार्य डी एस घुगरे, मनोहर परीट, अजित पाटील, राजेंद्र कोतकर तसेच जिल्ह्यातील शारीरिक शिक्षकांचे सहकार्य लाभले.