पेठवडगांव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभपूर्वक करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते.
यावेळी सत्कार करण्यात आलेल्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची नावे अशी - जॉईंट सेक्रेटरीपदी इरफान अन्सारी (नँशनल हायस्कूल, इचलकरंजी), कार्यकारिणी सदस्यपदी सूर्यकांत श्रीरंग चव्हाण (सौ.स.म.लोहिया हायस्कूल, कोल्हापूर), एम.एस.मोरुस्कर (श्री.शाहू कुमार भवन, गारगोटी), सौ.सारिका संदीप यादव (सह्याद्री विद्यानिकेतन, माले ता.हातकणंगले) यांची स्वीकृत सदस्य पदी बी.सी.वस्त्रद (दादासो मगदूम हायस्कूल, कोल्हापूर), अशोक आदगोंडा पाटील (रत्नसागर हायस्कूल, निमशिरगाव) सल्लागार सदस्यपदी एस.बी.चौगुले (राष्ट्रसेवा हायस्कूल, पुलाची शिरोली), माजीद पटेल (ईशा अतुल ऊलुम उर्दू हायस्कूल, आलास ता.शिरोळ) यांची तर मुख्याध्यापक महामंडळाच्या कौन्सिल सदस्यपदी डॉ.एस.बी.शिंदे (कुमार भवन, शेणगाव) यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारप्राप्त के.ए.देसाई (भुदरगड) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे खजिनदार नंदकुमार गाडेकर, संपर्कप्रमुख अशोक हुबळे, राज्य महामंडळाचे सदस्य एस.वाय.पाटील, एम.आर.पाटील,
अजित रणदिवे, एस.एल.उगारे, पी.जी.पोवार, रवींद्र मोरे, एम.के.आळवेकर, एस.आर.पाटील, बी.बी.हावले, जे.के.पाटील, संपत कळके, जी.ए.पाटील, व्ही.जी. मालिकवाडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडिटर मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी मानले.
फोटो : कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश संकपाळ, बाबा पाटील, दत्ता पाटील, मिलिंद पांगिरेकर