*
कसबा बावडा : कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम प्राथमिक महिला शिक्षिकांसाठी आयोजित *हातकणंगले प्रीमियर लीगमध्ये* कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक महिला शिक्षिकांनी प्रथम क्रमांक पटकावून चषक आपल्या नावे करून कोल्हापूर महानगरपालिकेचे नाव पूर्ण जिल्ह्यात झळकवल्याबद्दल सी.आर.सी.7 मधील राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक 11 कसबा बावडा या शाळेच्या वतीने विजयी संघाचा कौतुक सोहळा शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला.
प्रसंगी केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकातील महिलांनी घरच्या जबाबदारी बरोबर आपली आरोग्यासाठी वेळ देऊन आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी वेळ द्यावा. त्यासाठी एखादा आवडता खेळ छंद म्हणून जोपासावा. तरच आपल्या आरोग्याकडे लक्ष राहील व आपण सक्षम बनणार आहोत. असे प्रतिपादन केले.
सदर कौतुक सोहळ्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय लाडसाहेब,शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई मॅडम, शाळेचे केंद्रमुख्याध्यापक श्री.अजितकुमार पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रमेश सुतारसाहेब, संघाच्या
गीता काळे (कर्णधार),
प्रतिभा चौगुले (यष्टीरक्षक),सुजाता आवटी,
स्वाती चौगले,सोनाली मोरे,संजीवनी व्हरगे,प्रियांका साजणे,सुजाता खोत,सुनिता चौगले,उषा सरदेसाई,
वैशाली पाटील,जयश्री पुजारी
शुभेच्छा दीक्षित,स्नेहा कांबळे,सरिता सुतार आदी खेळाडू उपस्थित होते.संघ एकजुटीचे व खिलाडूवृत्तीचे सर्वतोपरी कौतुक करण्यात आले.