हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथे हेरले आशेचे व्दार प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने गावातील आशा वर्कर्स यांना छत्री, पर्स व स्टेशनअरी साहित्याचे वाटप करण्यात आले.
आशेचे व्दार प्रतिष्ठान ही सेवाभावी महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यातील गोरगरीब कुटूंबियांना अत्यावश्यक वस्तूसह इतर मदतही करते. संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात अशाच पध्दतीचा सामाजिक उपक्रम हेरले गावात संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच अश्विनी चौगुले, संदिप चौगुले यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कोल्हापूर जिल्हाचे सुपरवापार निलेश काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन जोसेफ पवार, जितेंद्र लोंढे, प्रशांत खावड्डिया, सचिन जाधव व प्रदिप लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वयंमसेवक अभिजीत चोपडे, राजू माने, रोहित कदम, प्रशांत गायकवाड, गजानन डोंगरे यांचे योगदान लाभले. या प्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत चोपडे यांनी केले .
फोटो
हेरले गांवात आशा वर्कर्सना छत्री, पर्स व स्टेशनअरी साहित्याचे वाटप करतांना आशेचे व्दार प्रतिष्ठान पुणे संस्था